Ricky Ponting On T20 World Cup 2024: वेस्ट इंडीज आणि अमेरिका आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T-20 World Cup 2024)  आयोजित करण्यासाठी सज्ज आहेत. ही स्पर्धा 2 जूनपासून सुरू होत आहे. त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्धच्या सामन्यापासून स्पर्धेला सुरुवात करेल. 


टी-20 विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने मोठी भविष्यवाणी केली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेईल, असा विश्वास रिकी पाँटिंगला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर असेल, असं रिकी पाँटिंगने सांगितले. आयपीएलमध्ये बुमराहने मुंबईकडून 13 सामन्यांत 20 बळी घेतले. हेडने हैदराबादकडून 15 सामन्यांतून 567 धावा केल्या. (Ricky Ponting On T20 World Cup 2024)


जसप्रीत बुमराह फलंदाजांसाठी अडचणीचा ठरणार-


रिकी पाँटिंग म्हणाला की, जसप्रीत बुमराह एक महान गोलंदाज आहे, तो गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. बुमराहने आयपीएलमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रिकी पाँटिंग जसप्रीत बुमराहकडे नवीन चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे, परंतु या गोलंदाजाला सर्वात खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची इकोनॉमी. जसप्रीत बुमराह प्रति षटक 7 पेक्षा कमी धावा देत आहे, जे T20 फॉरमॅटमध्ये अतिशय उत्तम आहे. तो संघाला जेव्हा विकेटची गरज असेल तेव्हा तो विकेट मिळवून देईल आणि संघासाठी तो कठीण परिस्थितीत षटक टाकेल, असं रिकी पाँटिंगने सांगितले.


ट्रॅव्हिस हेड सर्वाधिक धावा करेल-


 ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करेल, असा विश्वास रिकी पाँटिंगला आहे. रिकी पाँटिंग म्हणाला की, ट्रॅव्हिसने सर्व फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे, मग तो लाल चेंडू असो किंवा पांढरा चेंडू...ट्रॅव्हिस हेडने ज्या शैलीत फलंदाजी केली ती विलक्षण आहे. तो बेफिकीरपणे खेळत आहे. अलीकडे, ट्रॅव्हिस हेडने आयपीएलमध्ये खूप धावा केल्या, हा खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे टी-20 विश्वचषकात ट्रॅव्हिस हेड सर्वाधिक धावा करेल, असे मला वाटते.


भारतीय संघाचे वेळापत्रक


5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा 


टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ :


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज


राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान.


संबंधित बातम्या:


ICC T-20 World Cup 2024: ना रोहित, ना विराट, विश्वचषकात शतक झळकवणारा एकमेव भारतीय फलंदाज; 14 वर्षांपूर्वी केला होता भीमपराक्रम


टी-20 विश्वचषक, पत्नी नताशासोबत घटस्फोटाची चर्चा; आता हार्दिक पांड्याने केली पोस्ट, काय म्हणाला?


Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक पांड्याचे वासे फिरले! पोटगी म्हणून नताशाला 70 टक्के संपत्ती देणार?, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण