रिकी पाँन्टिंगने दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले; सौरव गांगुली सांभाळणार धुरा?
Ricky Pointing Delhi Capitlas: 2018 पासून 2023 च्या हंगामापर्यंत रिकी पॉटिंग दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत होता.
Ricky Pointing Delhi Capitlas: ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने (Ricky Pointing) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitlas) संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत दिल्ली कॅपिटल्सने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. रिकी पाँटिंग 2018 पासून दिल्ली कॅपिटल्ससोबत होता. रिकी पाँटिंग गेली 7 वर्षे दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक होता. त्याच्या कार्यकाळात दिल्ली कॅपिटल्स कधीही चॅम्पियन बनला नाही.
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रिकी पाँटिंगचे दिल्ली कॅपिटल्ससोबत घट्ट नाते आहे. 2018 पासून 2023 च्या हंगामापर्यंत रिकी पॉटिंग दिल्ली कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत होता. मात्र रिकी पाँटिंगने राजीनामा का दिला हे अद्याप कळू शकलेले नाही. रिकी पाँटिंगच्या प्रशिक्षकाखाली दिल्लीच्या अनेक युवा खेळाडूंचा खेळ सुधारल्याचे दिसून आले. रिकी पाँटिंगच्याच प्रशिक्षणाखाली दिल्लीने 2022 मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. फायनलमध्ये दिल्लीचा मुंबई इंडियन्सकडून 5 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागता होता. ही दिल्लीची सर्वोत्तम चांगली कामगिरी होती.
दिल्ली कॅपिटल्सने काय म्हटलं?
रिकी पाँन्टिंगच्या राजीनाम्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने X वर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये “प्रिय रिकी, तुम्ही मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होत आहात. हे व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत. तुम्ही आम्हाला काळजी, बांधिलकी, वृत्ती आणि प्रयत्न या चार महत्वाच्या गोष्टी शिकवल्या, असं दिल्लीने म्हटलं आहे. या आमच्या गेल्या सात हंगामातील आठवणी आहेत.
After 7 seasons, Delhi Capitals has decided to part ways with Ricky Ponting.
— Delhi Capitals (@DelhiCapitals) July 13, 2024
It's been a great journey, Coach! Thank you for everything 💙❤️ pic.twitter.com/dnIE5QY6ac
दिल्लीच्या संघाची 2018 पासून आयपीएलमधील कामगिरी-
दिल्लीचा संघ 2018 च्या लीग स्टेजपर्यंतच पोहचला. यानंतर 2019 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचले. दिल्लीचा संघ 2020 मध्ये अंतिम सामना खेळला होता. मात्र या सामन्यात पराभवाचा सामाना करावा लागलं. यानंतर 2021 मध्ये पुन्हा हा प्रवास प्लेऑफमध्ये पोहोचला. यानंतर आतापर्यंत तीन हंगामात संघ प्लेऑफ्समध्ये पोहोचू शकरला. पॉन्टिंग देखील आयपीएलमध्ये खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये 10 सामने खेळले आहेत. पॉटिंगने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पॉटिंगने शेवटचा सामना 2013 मध्ये खेळला होता.
गांगुलीला जबाबदारी दिली जाण्याची शक्यता-
संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे हे या पदावर कायम राहणार आहेत. सौरव गांगुलीला मुख्य प्रशिक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दिल्लीचे सह-मालक JSW आणि GMR समूह या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला भेटणार आहेत. या बैठकीत पुढील प्रशिक्षकावर चर्चा होणार आहे.
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार?
2022 च्या लिलावाप्रमाणे, मेगा लिलाव देखील 2 दिवसांसाठी आयोजित केला जाऊ शकतो. 2022चा लिलाव फेब्रुवारीमध्ये झाला होता, तर पुढील 2 वर्षांसाठी ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यात झाली होती. अशा परिस्थितीत, मेगा लिलावाची तारीख डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान ठेवली जाऊ शकते. 2022 मध्ये झालेला शेवटचा मेगा लिलाव बंगळुरूमधील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. पण 2023 आणि 2024 चे लिलाव अनुक्रमे केरळ आणि यूएईमध्ये झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच लिलावासाठी ठिकाणाचे नाव जाहीर करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.