Tamil Nadu Premier League: भारतीय कसोटी संघातून वगळलेला मुरली विजय (Murli Vijay) तब्बल दोन वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर उरतला. तिरूनेलवेलीमध्ये सुरु असलेल्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये (TNPL) रुबी ट्रीची वॉरियर्सविरुद्ध मुरली विजयला काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्यानं 13 चेंडूत आठ धावा करून धावचीत झाला.
मुरली विजयनं सप्टेंबर 2020 मध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून अखेरचा आयपीएल सामना खेळला होता. भारताकडून मुरली विजयनं 61 कसोटी सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो तामिळनाडूकडून खेळला नव्हता. तो स्थानिक क्रिकेट टीएनसीए लीगमध्येही खेळला नव्हता. तो गेल्या वर्षी टीएनपीएलमध्ये खेळला होता. त्यानं डिसेंबर 2019 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूकडून शेवटचा सामना खेळलाय. तर, भारताकडून 2018 मध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे अखेरचा कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून त्याला भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलंय.
पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा मुरली विजयचा दावा
दरम्यान, मुरली विजयनं क्रिकेट खेळण्यासाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा दावा केला. “मला शक्य तितक्या दिवस खेळायचं आहे. मी वैयक्तिक ब्रेक घेतला. मला माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायची होती. मी सध्या माझ्या क्रिकेटचा आनंद घेत आहे आणि मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे", असं मुरली विजयनं टीएनपीएलपूर्वी म्हटलं होतं.
मुरली विजयची कारकिर्द
मुरली विजय हा भारतासाठी यशस्वी कसोटी सलामीवीरांपैकी एक आहे. भारताकडून त्यानं आतापर्यंत 61 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 39 च्या सरासरीनं 3 हजार 982 धावा केल्या. मुरली विजयच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 12 शतके आणि 15 अर्धशतके आहेत. मात्र, मुरली विजयला त्याच्यात कारकिर्दीत एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळण्याची संधी फार कमी मिळाली आहे.
हे देखील वाचा-