Ranji Trophy 2022 Final Day 4 Live Updates: मुंबईचा संघ दुसऱ्या डावात 49 धावांनी पिछाडीवर

मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यात रणजी ट्राफीचा अंतिम सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रेदशच्या संघानं तीन विकेट्स गमावून 368 धावा केल्या आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Jun 2022 06:02 PM

पार्श्वभूमी

Ranji Trophy 2022 Final Day 4: मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यात रणजी ट्राफीचा अंतिम सामना खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रेदशच्या संघानं तीन विकेट्स गमावून 368 धावा केल्या आहेत....More

Ranji Trophy 2022 Final Day 4: मुंबईचा संघ दुसऱ्या डावात 49 धावांनी पिछाडीवर

मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यातील रणजी ट्रॉफी फायनल सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 374 धावा केल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या संघानं पहिल्या डावात सर्वबाद 536 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघानं चौथ्या दिवसाअखेर दोन विकेट्स गमावून 113 धावा केल्या आहेत. सध्या मुंबईचा संघ 49 धावांनी पिछाडीवर आहे.