Rohit Sharma : कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी-20 क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. 2024 टी-20 वर्ल्ड कप विजेतेपद भारताला जिंकून दिल्यानंतर रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. यानंतर रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत टी-20 प्रमाणे फलंदाजी केली. त्यानंतर चर्चा सुरू झाली की, कदाचित रोहित टी-20 मधून निवृत्ती माघारी घेईल. पण आता त्याने निवृत्तीवर मजेशीर उत्तर दिले आहे.


बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी रोहित शर्मा जिओ सिनेमावर म्हणाला, "आजकाल जागतिक क्रिकेटमध्ये निवृत्ती हा विनोद बनला आहे. लोक निवृत्तीची घोषणा करतात, पण नंतर पुन्हा खेळायला येतात. भारतात असे घडले नाही. मात्र, इतर देश त्यांच्या निवृत्तीची घोषणा करतात. परंतु नंतर यू-टर्न घेतात जेणेकरून कोणीतरी खरोखर निवृत्त झाले आहे की नाही हे तुम्हाला कधीच कळणार नाही."


टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीबाबत रोहित म्हणतो की, "माझा निर्णय अंतिम आहे आणि मी अगदी स्पष्ट आहे. टी-20 इंटरनॅशनलला अलविदा करण्याची हीच योग्य वेळ होती. मी माझी निवृत्ती परत घेणार नाही." रोहितने असेही सांगितले की, त्याला टी-२० फॉरमॅट खेळायला खूप आवडते.


रोहित आयपीएलमध्ये खेळत राहणार


रोहित शर्माने नुकतीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. मात्र, आयपीएल 2025 मध्ये तो संघ बदलणार असल्याची चर्चा आहे. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला गेला तर, रोहित शर्माने मुंबई इंडियन्सपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आगामी हंगामात तो इतर काही संघात खेळताना दिसू शकतो. लखनऊ सुपर जायंट्सला टी-20 वर्ल्ड कप विजेत्याला आपला कर्णधार बनवायचा आहे, अशीही बातमी आली होती. अशा परिस्थितीत रोहित आयपीएल 2025 मध्ये कोणत्या संघासोबत खेळताना दिसतो हे पाहणे बाकी आहे.


हे ही वाचा -


Ricky Ponting : IPL 2025 पूर्वी पंजाब किंग्जमध्ये मोठा बदल, चॅम्पियन पाँटिंगची कळपात एन्ट्री, प्रीती झिंटाचा यंदा जिंकणार ट्रॉफी?


Ind vs Ban Aaditya Thackeray : बांगलादेश क्रिकेट संघाला पायघड्या का घालतंय? कुठे गेले तुमचे हिंदूत्व?, आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल


Ind vs Ban 1st Test : रोहित शर्मा नाणेफेक हारला तर होणार मोठा गेम; चेन्नई पिचवर भारताने प्रथम फलंदाजी करावी की गोलंदाजी? जाणून घ्या आकडेवारी