Ricky Ponting appointed head coach of Punjab Kings : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या आधी पंजाब किंग्जने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्जचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून चॅम्पियन रिकी पाँटिंगची नियुक्ती करण्यात आली आहे. पाँटिंग याआधी दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक होता, पण त्याने त्याला सोडला. आता प्रीती झिंटाच्या टीमने त्याला साइन केले आहे.


7 वर्षे दिल्लीचे प्रशिक्षक


रिकी पाँटिंग हा एक उत्कृष्ट कर्णधार आणि खेळाडू आहे आणि तो गेल्या सात वर्षांपासून दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक होता. त्याच्या कोचिंगमध्ये दिल्लीचा संघ चॅम्पियन बनू शकला नसला तरी आयपीएल 2020 मध्ये अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. विशेष म्हणजे पाँटिंगच्या कोचिंगमध्ये मुंबई इंडियन्सने 2015 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. पाँटिंगकडे आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्यामुळेच पंजाब किंग्जने त्याला प्रशिक्षक बनवले आहे.


प्रीती झिंटाचा यंदा जिंकणार ट्रॉफी? 


अलीकडे, रिकी पाँटिंगने मेजर लीग क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन फ्रीडम संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला, जिथे संघाने त्यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद जिंकले. या संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ होता आणि त्यात मॅक्सवेल आणि हेडसारखे खेळाडूही होते. आता, प्रीती झिंटा आणि तिची टीम पॉन्टिंगला पंजाब किंग्जसोबत अशीच जादू करायला आवडेल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पंजाब किंग्सने अद्याप आयपीएल जिंकलेले नाही, आणि पाँटिंगकडे अशी प्रतिभा आहे, जी त्यांना पहिले विजेतेपद मिळवून देऊ शकतो.


यावर्षी पंजाब किंग्जने दोन वर्षांच्या कराराखाली संघात सामील झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हर बेलिसला काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्याच्या प्रशिक्षणाखाली संघाला फारसे यश मिळाले नाही आणि खराब कामगिरी कायम राहिली. बेलिसच्या मार्गदर्शनाखाली पंजाब किंग्स एकदाही अंतिम चारमध्ये पोहोचू शकला नाही. याच कारणामुळे संघाने त्याचा करार वाढवला नाही. त्याचवेळी आता रिकी पाँटिंगच्या एन्ट्रीची ताफ्यात घेतले आहे.






हे ही वाचा -


Ind vs Ban Aaditya Thackeray : बांगलादेश क्रिकेट संघाला पायघड्या का घालतंय? कुठे गेले तुमचे हिंदूत्व?, आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल


Ind vs Ban 1st Test : रोहित शर्मा नाणेफेक हारला तर होणार मोठा गेम; चेन्नई पिचवर भारताने प्रथम फलंदाजी करावी की गोलंदाजी? जाणून घ्या आकडेवारी


IPL 2025 Mega Auction : एक, दोन नाही तर... 6 संघांचे कर्णधार बदलणार, या हंगामात दिग्गज खेळाडूंची होणार हकालपट्टी?