Rohit Sharma, WTC Final 2023 : टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरण्यात अपयश आलं. लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलं होतं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 86 धावांच्या भागिदारीनं भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम राखली होती. पण स्कॉट बोलँडनं विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाला लागोपाठच्या चेंडूंवर माघारी धाडून टीम इंडियाची पाच बाद 179 अशी बिकट अवस्था केली. मग मिचेल स्टार्कनं अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं. त्या तीन धक्क्यांमधून न सावरलेला भारताचा डाव 234 धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियानं जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरलं. भारताच्या पराभवानंतर नेटकरी चांगलेच भडकलेत... टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनील गावसकारांनीही निशाना साधला.. विराट, रोहित शर्मा स्वत:साठी खेळत असल्याच वक्तव्य केलेय. 


दहा वर्षांपासून टीम इंडियाकडे आयसीसीची कोणताही ट्रॉफी नाही.. यंदा टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा गदा उचलणार, अशी आपेक्षा सर्वांनाच होती. पण स्वप्न भंगले अन् चाहत्यांचा राग अनावर गेला. अनेकांनी यासाठी कर्णधार रोहित शर्मा याला जबाबदार धरले.... रोहित शर्माने निवृत्ती  घ्यायला हवी.. अशा अशाची ट्वीटही केलेत.. त्याशिवाय वडापाव म्हटले जातेय... रोहित शर्माला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. दुसरीकडे काही जणांनी रोहित शर्माची पाठराखण केली आहे. 


पाहा नेटकरी काय म्हणाले...


 






युजरने ट्वीट करत लिहिले की, “कर्णधारपद सांभाळू शकत नाही, फलंदाजी करू शकत नाही, क्षेत्ररक्षण करू शकत नाही, फिट राहू शकत नाही, रोहित शर्मा भारतीय संघाचा सर्वात मोठा चोकर आहे. जर वनडे विश्वचषक 2023 जिंकायचा असेल, तर रोहितला कर्णधारपदावरून हटवा.”