India vs Australia, WTC Final 2023 : जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरण्यात भारतीय संघाला पुन्हा एकदा अपयश आलं. लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी दारुण पराभव केला. WTC फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा जाऊन टीम इंडियाच्या पदरी निराशाच पडली. भारतीय संघाच्या पराभवाचं प्रमुख कारण, तयारी सांगितले जातेय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी टीम इंडियाने पूर्ण तयारी केली होती का? आयपीएलमध्ये जास्त वेळ दिल्यामुळे हा पराभव ओढावलाय का? आयपीएलमुळे अनुभवी खेळाडूंना आराम मिळाला का ? यासारखे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 


आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा समारोप 29 मे रोजी झाला.. त्यानंतर काही खेळाडू लंडनमध्ये दाखल झाले. रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, शुभमन गिल हे खेळाडू लंडनमध्ये फक्त आठवडाभर आधी दाखल झाले. त्याशिवाय इतर खेळाडूही दहा दिवस आधी इंग्लंडमध्ये दाखल झाले होते. मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या आघाडीच्या दोन गोलंदाजांना आयपीएलमुळे आराम मिळाला नाही. या दोघांनी आयपीएलमध्ये जास्त गोलंदाजी केली होती. शमी याने 17 सामन्यात 65 षटके गोलंदाजी केली तर सिराजने 14 सामन्यात 50 षटके गोलंदाजी केली. रविंद्र जाडेजा याने 57 षटके गोलंदाजी केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलआधी खेळाडूंना आराम मिळाला नाही.. त्याशिवाय तयारीला वेळही तितकासा मिळाल्याचे दिसत नाही. टी20 मध्ये आणि कसोटीमध्ये गोलंदाजीचा टप्पा वेगळा असतो, अशात टी20 नंतर कसोटी खेळताना गोलंदाजांना पूर्ण तयारी करावी लागते. शार्दूल ठाकूर आणि उमेश यादव यांनाही तितका आराम मिळाला नाही. सिराज आणि शमी यांच्यासह इतर खेळाडूंना महत्वाच्या सामन्यापूर्वी तयारीला आणि आराम करायला पुरेसा वेळ मिळाला नाही. याचा परिणाम त्यांच्या गोलंदाजीवरही दिसत होता. मोहम्मद शमी याने संपूर्ण सामन्यात फक्त 45 षटके गोलंदाजी केली.. तर सिराजने 48 षटकांचा मारा केला. 


सिराजचा प्रभावी मारा - 


जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोहम्मद शमी याने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. पण आराम मिळाला असता तर सिराज आणखी प्रभावी ठरला असता. सिरजाने पहिल्या डावात महत्वाचे चार बळी घेतले होते. शमी याबाबत पिछाडीवर दिसला... शमीला संपूर्ण सामन्यात फक्त चार विकेट घेता आल्या. त्याशिवाय उमेश यादव याचाही मारा प्रभावहीन जाणवला. 


भारताचा 209 धावांनी पराभव -











टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरण्यात अपयश आलं. लंडनच्या ओव्हल मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलं होतं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 86 धावांच्या भागिदारीनं भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम राखली होती. पण स्कॉट बोलँडनं विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाला लागोपाठच्या चेंडूंवर माघारी धाडून टीम इंडियाची पाच बाद 179 अशी बिकट अवस्था केली. मग मिचेल स्टार्कनं अजिंक्य रहाणेला माघारी धाडलं. त्या तीन धक्क्यांमधून न सावरलेला भारताचा डाव 234 धावांवर आटोपला. आणि ऑस्ट्रेलियानं जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवर आपलं नाव कोरलं.

 

आणखी वाचा :