Ravindra Jadeja Ruled Out IND vs BAN ODI Series : भारतीय संघ (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून यानंतर लगेचच बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने भारत बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. या दौऱ्यात स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणार होता. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार जाडेजाची दुखापत अजूनही कायम असून तो एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे, तसंच कसोटी मालिकेतही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह असल्याची माहिती ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिली आहे.
रवींद्र जाडेजाला आशिया कप खेळत असताना गुडघ्याची दुखापत झाली होती. ज्यानंतर त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळेच तो टी20 विश्वचषक स्पर्धाही खेळू शकला नाही. आता तो हळूहळू रिकव्हर होत असताना त्याला बांगलादेशविरुद्ध दौऱ्यात एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत संधी देण्यात आली. पण आता त्याची दुखापत पूर्णपणे ठिक नसली झाल्याने तो एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलाच आहे आणि शक्यतो कसोटी मालिकाही खेळण्याची शक्यता कमीच आहे.
पर्याय कोण?
जाडेजाच्या जागी जर फिरकीपटू अष्टपैलू म्हटलं तर युवा शाहबाज अहमदचं (Shahbaz ahmad) नाव चर्चेत आहे. संघात आधीच बरेच फिरकीपटू असताना संघ व्यवस्थापन शाहबाजला संधी देईल की दुसऱ्या कोणत्या खेळाडूचा विचार होईल हे पाहावे लागेल. सध्या कमाल फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवला या दौऱ्यात स्थान नसून त्यालाही संधी दिली जाऊ शकते.
बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय संघ?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल
भारत आणि बांग्लादेश एकदिवसीय सामन्याचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 4 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
दुसरा एकदिवसीय सामना | 7 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
तिसरा एकदिवसीय सामना | 10 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
हे देखील वाचा-