IPL 2023, Mumbai Indians : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चषक उंचावलेला संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली. खासकरुन त्यांची गोलंदाजीची बाजू कमकुवत दिसून येत होती. त्यात मेगा लिलावाच त्यांनी जोफ्रा आर्चरला तब्बल 8 कोटी रुपये देऊन खरेदी केलं. तो दुखापतग्रस्त असूनही त्याला इतकी रक्कम देऊन मुंबईनं खरेदी केलं होतं. पण तो एकही सामना खेळू शकला नाही. पण आता आगामी हंगामापूर्वी (IPL 2023) जोफ्रा दुखापतीतून सावरत असल्याचं समोर येत आहे.
दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर असलेला इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आता बर्यापैकी दुखापतीतून सावरला असून तो आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार अशी दाट शक्यता आहे. जोफ्राने गोलंदाजीचा सरावही सुरू केला असून. जोफ्रा त्याच नेटमध्ये सराव करताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जोफ्रा पुन्हा आपल्या जुन्या लयीत परतताना दिसत आहे.
पाहा VIDEO-
मुंबईनं रिलीज केलं 13 खेळाडूंना
मुंबईने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. लिलावापूर्वी मुंबईने संघातील एकूण 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे मिनी ऑक्शनमध्ये मुंबई पूर्णपणे नवीन संघ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. लिलावासाठी मुंबईकडे 20.55 कोटी रुपये शिल्लक असून पोलार्ड सारख्या दिग्गज खेळाडूलाही संघानं अलविदा केलं आहे. तर मुंबईने कोणते खेळाडू रिलीज आहेत आणि कोणते खेळाडू अद्याप संघात आहेत ते जाणून घेऊया.
मुंबईनं रिलीज केलेले खेळाडू
कायरन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंग, आर्यन जुयाल, बेसिल थंपी, डॅनियल सायम्स, फॅबियन ऍलन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रिले मेरेडिथ, संजय यादव आणि टायमल मिल्स.
कोणते खेळाडू अजूनही मुंबई इंडियन्समध्ये
रोहित शर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल
आगामी ऑक्शनसाठी कशी असेल मुंबईची रणनीती?
मुंबई लिलावात 20.55 कोटी रुपये घेणार असून एक मिनी ऑक्शनसाठी ही रक्कम एक मोठी रक्कम आहे. पण आयपीएल 2022 मधील अनुभव पाहता मुंबईला खेळाडूंच्या निवडीत हुशारी दाखवावी लागणार आहे. सध्या त्यांच्याकडे तीन परदेशी खेळाडूंसाठी जागा आहे. भारतीय खेळाडूंसाठीही बरीच जागा असून लिलावात मुंबईला चांगले मधल्या फळीतील फलंदाज आणि फिनिशर खेळाडू शोधण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. त्यात पोलार्डची जागा भरून काढणं सोपं काम नसणार आणि गोलंदाजीतही फिरकीपटू मुंबईला गरजेचे आहेत.