Team India, IND vs BAN :ारतीय क्रिकेट संघाचा (Team India) स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) भारताच्या बांगलादेश दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे. मागील काही काळ दुखापतीमुळे तो संघाबाहेर असून टी20 विश्वचषकही खेळू शकला नव्हता. आता तो दुखापतीतून सावरत असल्याचं वृत्त येत होतं, पण संघ व्यवस्थापनाला त्याला पुन्हा संघात आणण्यात घाई करायची नसल्यानं बांगलादेश दौऱ्यात रवींद्र जाडेजाला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे जाडेजाच्या जागी जर फिरकीपटू अष्टपैलू म्हटलं तर शाहबाज अहमदसाठी (Shahbaz ahmad) संघाचे दरवाजे उघडू शकतात.


पण संघाच आधीच तीन फिरकीपटू असताना संघ व्यवस्थापनाला वन डे आणि कसोटी अशा मोठ्या फॉर्मेटसाठी हा बदल करण्याची गरज आहे का? आणि असं संघ व्यवस्थापन करेल का? हे पाहावं लागेल. तसंच शाहबाजशिवाय आणखी एक पर्याय म्हणजे सूर्यकुमार यादव हा आहे. सूर्याने टी20 विश्वचषक आणि अलीकडच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कमाल कामगिरी केल्याने कसोटी संघात त्याला संधी मिळू शकते. तसंच वन डे टीमध्येही त्याची जागा बनू शकत असल्याने त्याला या दौऱ्यात जाडेजाच्या जागी रिप्लेस केलं जाऊ शकतं. 


जाडेजाच्या खेळण्यावर प्रशचिन्ह


मागील महिन्यात बांगलादेश दौऱ्यासाठी रवींद्र जाडेजाचा संघात समावेश करताना बीसीसीआयने म्हटले होते की, त्याचं सामने खेळणं फिटनेसवर अवलंबून आहे. सध्यातरी नियामक मंडळाचे अधिकारी मात्र याबाबत मौन बाळगून आहेत. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिया चषकातून बाहेर झाल्यानंतर जाडेजा अद्याप पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही. त्याला पुन्हा भारतीय संघात सामील होण्याआधी त्याने पूर्णपणे तंदुरुस्त व्हावे, अशी बोर्डाची इच्छा आहे.


बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय संघ?


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल


बांग्लादेशविरुद्ध कसोटी संघ?


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.   


हे देखील वाचा-