India vs West Indies Toss Update : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघानी आपआपले संघ जाहीर केले आहे. यावेळी भारतीय संघात दिग्गज खेळाडूंचं पुनरागमन झालं आहे. यामध्ये दुखापतीतून सावरलेला रवींद्र जाडेजा संघात असून रवीचंद्रन आश्विनही संघात आहे. कुलदीप यादवला मात्र आज संधी मिळालेली नाही. 


सामन्यापूर्वी नुकतीच नाणेफेक पार पडली असून वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतीय संघ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली दिग्गज खेळाडूंना घेऊन मैदानात उतरला आहे. यावेळी सलामीला रोहितसोबत सूर्यकुमार, त्यानंतर श्रेयस अय्यर, पत, दिनेश कार्तिक हे मैदानात येतील. अष्टपैलू कामगिरीकरता जाडेजा, आश्विन हे असून गोलंदाजीची जबाबदारी आश्विन, जाडेजा सह भुवनेश्वर, अर्शदीप आणि रवी बिश्नोईवर असेल तर नेमका संघ कसा आहे पाहूया...



भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा, हार्दीक पांड्या,दिनेश कार्तिक, रवी बिश्नोई, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंह 



कसा आहे वेस्ट इंडीज संघ?


काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार),  जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडेन स्मिथ, ओबेद मकॉय, अल्झारी जोसेफ, किमो पॉल, अकेल हुसेन.  


एकदिवसीय मालिकेतील तिन्ही सामने भारताने जिंकले आणि वेस्ट इंडीजला 39 वर्षांत प्रथमच त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश दिला. ज्यानंतर आता भारत टी20 मालिकाही जिंकून एक नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाली आहे. 



हे देखील वाचा-