IND vs WI, 1st T20, Weather Report : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West indies) यांच्यात त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर पार पडणाऱ्या पहिल्या टी20 सामन्याला काही वेळ शिल्लक आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना आहे. आजचा सामना जिंकणारा संघ मालिकेत 1-0 ची आघाडी घेणार असल्याने हा सामना दोघांसाठी मालिकेची यशस्वी सुरुवात करण्यासाठी महत्त्वाचा आहे. पण याच सामन्यात जर पावसाचा व्यत्यय आला तर काय होईल? कारण वन डे मालिकेतील अखेरच्या सामन्यात सतत पाऊस येत असल्याने दोन्ही संघाना अडचण आली होती. अशामध्ये आज टी20 सामन्यातही असंच काहीशी शक्यता आहे. कारण आज सामना होणाऱ्या त्रिनिदाद येथील वातावरणात जवळपास 80 टक्के पावसाची शक्यता आहे.
हवामानाची माहिती देणाऱ्या Weather.com ने दिलेल्या माहितीनुसार आज त्रिनिदाद येथील सामना होणाऱ्या ठिकाणी 24 ते 52 टक्के ढगाळ वातावरण असणार आहे. ज्यामुळे किमान 1 तास तरी पाऊस नक्कीच पडेल. वातावरणही 24 ते 31 अंश सेल्सियसमध्ये असणार असून वातावरणार 67 ते 85 टक्के आर्द्रता असणार आहे. त्यामुळे आजचा सामना कसा पार पडेल, ओव्हर्सची संख्या कमी होईल, कि डकवर्थ लुईस नियम लागू होईल, अशा प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष आहे.
कशी आहे मैदानाची स्थिती?
आजचा सामना होणाऱ्या मैदानात हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असला तरी कॅरेबियान प्रीमियर लीगचे (CPL) सामने याठिकाणी झाले असून त्या सामन्यांच्या आधारे याठिकाणची मैदानाची स्थिती सांगतिली जाऊ शकते. त्यानुसार ही खेळपट्टी गोलंदाजांना आणि फलंदाजांना दोघांना बऱ्यापैकी मदत देऊ शकते. याआधी येथे झालेल्या टी20 सामन्यांत 7.40 च्या इकोनॉमी रेटने रन झाले आहेत. ज्यामुळे आजही एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो.
संभाव्य भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), अक्षर पटेल, हार्दीक पांड्या, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान
संभाव्य वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडेन स्मिथ, ओबेद मकॉय, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श, अकेल हुसेन.
हे देखील वाचा -