India Pakistan World Championship 1985 Final: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना 1985 मध्ये बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये (India-Pakistan World Championship 1985 Final) सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्यांना गोल्डन 'Audi 100 Car' भेट देण्यात आली होती. शास्त्रींनी आता या सामन्याशी संबंधित एक रंजक किस्सा सांगितला आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितलं. किस्सा सांगताना ते म्हणाले आहे की, पाकिस्तानच्या जावेद मियांदादने (Javed Miandad) फायनलमध्ये स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला होता.
गाडीवरून मियांदादने शास्त्रींना डिवचलं
शास्त्री म्हणाले की, ''1985 च्या बेन्सन अँड हेजेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी आम्हाला 15-20 धावांची गरज होती. फील्ड सेटिंग पाहण्यासाठी मी स्क्वेअर लेगला जात होतो. पाकिस्तानचा कर्णधार जावेद मियांदाद मिड-विकेटवर होता. तो मला म्हणाला की, तू तिथे पुन्हा पुन्हा काय पाहतो आहेस. गाडीकडे का बघतोयस? ती तुला भेटणार नाही, मी जावेदला सांगितले की, ती (गाडी) माझ्याकडेच येत आहे.''
शास्त्रींची मालिकेत चांगली कामगिरी
बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात रवी शास्त्री यांनी चमकदार अष्टपैलू कामगिरी केली. या सामन्यात त्यांनी नाबाद 63 धावांची खेळी करत 1 विकेट आपल्या नावावर केला. त्याचबरोबर या स्पर्धेत त्यांनी 5 सामन्यात 45.50 च्या सरासरीने 182 धावा केल्या आणि 8 विकेट्स आपल्या नावावर केल्या. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले आणि त्यांना ऑडी कार देण्यात आली. नंतर याच कारमधून भारतीय खेळाडूंनी मैदानात फेऱ्या मारल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या:
Six Sixes In An Over: सहा चेंडूत सहा षटकार! 19 चेंडूत 84 धावा; पुदुच्चेरी टी-10 क्रिकेटमध्ये पांडेची वादळी खेळी
Mitchell Marsh : दिल्लीच्या पराभवानंतर प्रथमच बोलला मिचेल मार्श, पाहा नेमकं काय म्हणाला?
Khelo India Youth Games 2022 : कबड्डीत मुलींची दमदार आगेकूच, छत्तीसगडला 44 गुणांनी चारली धूळ