Six Sixes In An Over: पुदुच्चेरी टी-10 क्रिकेट लीगमध्ये रॉयल्स आणि पॅट्रियट्स यांच्यात एक अतिशय रोमांचक सामना खेळला गेला आणि या सामन्यात पॅट्रियट्सचा फलंदाज कृष्णा पांडेनं (Krishna Pandey) अप्रतिम कामगिरी करून दाखवली. त्यानं रॉयल्सविरुद्ध सामन्यात एकाच षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताकडून टी-20 क्रिकेटच्या इतिहासात माजी क्रिकेटपटू युवराज सिंहनं सहा चेंडूत एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. मात्र, टी-10 लीगमध्ये कृष्णा पांडेनं एकाच षटकात सहा षटकार मारले आहेत. 
 
नाणेफेक जिंकून रॉयल्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
या सामन्यात रॉयल्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 10 षटकात 3 गडी गमावून 157 धावा केल्या. रॉयल्ससाठी आर रघुपतीनं 30 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या. तर, प्रियम आशिष आणि संतोष कुमारन यांनीही संघासाठी चांगलं योगदान दिलं. दुसरीकडं, पॅट्रियट्ससाठी एस परमेश्वरन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आणि त्यानं 25 धावांत 2 विकेट्स घेतल्या.


पॅट्रियट्सचा चार धावांनी पराभव
प्रत्युत्तरात पॅट्रियट्सची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि या संघानं पाच षटकांत तीन विकेट्स गमावले. यानंतर कृष्णा पांडेनं तुफानी खेळी खेळली आणि 19 चेंडूत 436.80 च्या स्ट्राईक रेटनं 83 धावा केल्या . यादरम्यान, त्यानं 12 षटकार आणि दोन चौकार मारले आहेत. या खेळीत त्याने सहा चेंडूंत सहा षटकार मारण्याचा पराक्रमही केला आहे. कृष्णानं आपल्या संघाला जवळपास विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहचलं. परंतु, त्याला पॅट्रियट्सला सामना जिंकून देता आला नाही. फक्त चार धावांनी पॅट्रियट्सच्या संघाला पराभव स्वीकारावा लागलाय. 


कृ्ष्णावर कौतूकाचा वर्षाव
या सामन्यात कृष्णानं झंझावती खेळी केली. परंतु, पॅट्रियट्सला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरल्यानं तो निराश होता. मात्र, त्याच्या दमदार कामगिरीसाठी त्याच्या सहकारी खेळाडूंनी डग-आऊटमध्ये उभे राहून त्याला जोरदार प्रोत्साहन दिलं. सहा चेंडूत सहा षटकार मारणे सोपे नाही, पण कृष्णानं ते करून दाखवलं.


व्हिडिओ- 



हे देखील वाचा-