Rashid Khan Stats & Records नवी दिल्ली : अफगानिस्तानचा कॅप्टन राशिद खान याचा जगभरातील आक्रमक गोलंदाजांच्या यादीत समावेश होतो. राशिद खान टी 20 क्रिकेटमध्ये दमदार करतो. टी 20 क्रिकेटमध्ये राशिदच्या गुगली आणि गोलंदाजीमधील बदलांपपुढं फलंदाजांना फटकेबाजी करणं अवघड होतं. राशिद खान आयपीएल आणि जगभरातील विविध क्रिकेट लीगमध्ये खेळतो. राशिद खाननं वयाच्या 25 व्या वर्षी 600 टी 20 क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या आहेत.  


राशिद खानशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोलंदाजाला टी20 क्रिकेटमध्ये 600 विकेट घेता आलेल्या नाहीत. राशिद खानचं टी 20 करिअर पाहिलं असता त्यानं अफगाणिस्तानसाठी 93 मॅच खेळलेल्या आहेत. यामध्ये त्यानं 6.08 च्या इकोनॉमीनं 14.14 च्या सरासरीनं 152 विकेट घेतल्या आहेत. राशिदनं टी 20 क्रिकेटमध्ये दोन वेळा 5-5 विकेट घेतल्या आहेत.  याशिवाय 7 मॅचमध्ये त्यानं 4 विकेट घेतल्या आहेत. राशिद खाननं 5  धावा देत 3 विकेट घेतल्या आहेत, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 
 
राशिद खाननं आयपीएलमध्ये आतापर्यंत 121 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 6.82 च्या इकोनॉमीनं आणि 21.83 च्या सरासरीनं 149 विकेट घेतल्या आहेत. राशिद खाननं आयपीएलमध्ये 24  धावा देत 4 विकेट घेतल्या ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. राशिद खाननं याशिवाय बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग, मेजर क्रिकेट लीगसह इतर लीग मध्ये टी 20 क्रिकेट खेळलेलं आहे. आंतरराष्ट्रीय सामने आणि लीग क्रिकेट मिळून राशिद खाननं 600 विकेट घेतल्या आहेत. 



राशिद खानच्या नेतृत्त्वात अफगाणिस्तानची दमदार कामगिरी


नुकत्याच पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्ताननं चांगली कामगिरी केली होती. अफगाणिस्ताननं उपांत्य फेरीपर्यंत धडक दिली होती. अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास महत्त्वाचा होता. अफगाणिस्तानला जरी अंतिम फेरीत प्रवेश करता आला नसला तरी देशभरात संघाच्या यशानंतर जल्लोष करण्यात आला होता. उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला पराभूत केलं होतं. 


दरम्यान, अफगाणिस्तान न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारतात खेळणार आहे. 


संंबंधित बातम्या : 


IND vs SL 3rd T20 : सूर्या ब्रिगेड श्रीलंकेला व्हाईट वॉश देणार, गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात भारताकडे इतिहास रचण्यची संधी