Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव तोपर्यंत भारताच्या टीमचा कर्णधार असेल, दिग्गज क्रिकेटपटूनं केला दावा, नव्या कॅप्टनचं नाव सांगितलं
भारताच्या श्रीलंका दौऱ्यात टी 20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला कर्णधार करण्यात आलं होतं. या मालिकेत सूर्यानं भारताला 2-0 अशी विजयी आघाडी मिळवून दिलेली आहे. सूर्यकुमार यादवची पहिली मालिका सुरु असतानाच न्यूझीलंडचा माजी ऑलराऊंडर स्कॉट स्टायरिसनं मोठं वक्तव्य केलं आहे. सूर्यकुमार यादव अस्थायी कॅप्टन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्कॉट स्टायरिसच्या मते गौतम गंभीरला दीर्घकाळ नेतृत्त्व करेल असा पर्याय मिळालेला नाही. त्यामुळं सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आलेली आहे. सूर्याला थोड्या कालावधीसाठी संधी देण्यात आली आहे. गौतम गंभीर दीर्घ काळासाठी नेतृत्त्व करेल अशा खेळाडूच्या शोधात आहे. शुभमन गिल हा भारताचा दीर्घकाळासाठी कॅप्टन होऊ शकतो असं स्टायरिस म्हणाला.
निवड समितीच्या सदस्यानं पुढील काळात नेतृत्त्व करण्यासाठी तयार करण्याच्या इराद्यानं त्याला भारताच्या एकदिवसीय आणि टी 20 संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
स्कॉट स्टायरिसच्या मते शुभमन गिल 10 वर्ष भारताचं नेतृत्त्व करु शकतो. शुभमन गिल पुढील 10 वर्ष भारताचं नेतृत्त्व करु शकतो अद्याप तो या जबाबदारीसाठी पूर्णपणे तयार नसल्यानं त्याच्या पेक्षा अधिक अनुभव असलेल्या खेळाडूकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असं स्टायरिस म्हणाला.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं चांगली कामगिरी केल्यास तो आगामी टी20 वर्ल्ड कप पर्यंत कर्णधार राहू शकतो. सूर्यकुमार यादवनं चांगलं काम केल्यास तो 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत नेतृत्त्व करु शकतो. त्यानंतर नव्या कर्णधाराचा विचार केला जाऊ शकतो, हा एक समजूतदारपणाचा निर्णय आहे, असंही स्कॉट स्टायरिस म्हणाला.
दरम्यान सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं श्रीलंकेविरुद्धची टी 20 मालिका जिंकली आहे. यापूर्वी सूर्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका देखील जिंकली होती.