एक्स्प्लोर

IND vs SA, ODI Series : रजत पाटीदार ते मुकेश कुमार, 'हे' 4 खेळाडू भारतीय संघातून पदार्पणासाठी सज्ज

IND vs SA ODI Squad : दक्षिण अफ्रिका संघाविरुद्ध भारताने टी20 मालिका जिंकल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेसाठीही संघ जाहीर केला आहे. यावेळी नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

IND vs SA, ODI Series Team India : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) एकदिवसीय मालिकेसाठी भारताने आपला संघ जाहीर केला असून यावेळी बऱ्याच नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार असून आगामी विश्वचषकासाठी सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यासाठी युवा खेळाडूंना संघात घेतलं गेलं आहे. यावेळी रजत पाटीदार, मुकेश कुमार, राहुल त्रिपाठी आणि शाहबाज अहमद या चार आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंना भारताच्या एकदिवसीय संघात जागा मिळाली आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाचं नेतृत्त्व शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) तर उपकर्णधारपद श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्याकडे दिलं गेलं आहे. संघात आयपीएल 2022 गाजवणाऱ्या बऱ्याच युवा खेळाडूंना संधी दिली गेली असल्याने चार नव्या खेळाडूंना भारतीय संघाची दारं खुली झाली आहेत. यामधील रजत पाटीदारने आयपीएल प्लेऑफमध्ये शतक झळकावून चांगलं नाव कमावलं. त्यानंतर त्याने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आणि न्यूझीलंड-ए विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही शतक झळकावलं. याच खेळीच्या जोरावर त्याला आता टीम इंडियामध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाज मुकेश कुमारनेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने छाप पाडली. नुकत्याच न्यूझीलंड-अ विरुद्ध खेळल्या गेलेल्या प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. याशिवाय राहुल त्रिपाठी आणि शाहबाज अहमद या दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये कमाल कामगिरी केली. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 6 ऑक्टोबर 2022 लखनौ
दुसरा एकदिवसीय सामना 9 ऑक्टोबर 2022 रांची 
तिसरा एकदिवसीय सामना 11 ऑक्टोबर 2022 दिल्ली

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्येMuddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget