रायगड :  मुंबईवरून आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जात असलेल्या चाकरमान्यांना  माणगावमधील मुंबई -गोवा हायवेवरील जोशी वडेवाले हॉटेलमध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. नाश्ता करण्यासाठी मागवलेल्या वड्यांमध्ये मीठ जास्त असल्याची तक्रार या व्यक्तींनी सबंधित हॉटेल चालकाला विचारली. मात्र तक्रार समजून घेण्याच्या अगोदरच तक्रारदाराला दम देऊन शिव्या देण्यास सुरूवात केली. या हॉटेलमध्ये काम करत असलेल्या उत्तर भारतीयांनी 2 छोट्या मुलांसह महिलांना मारहाण सुरु केली. यामधे एक महिला ही गर्भवती असल्याचे देखील समोर आले आहे. या महिलांवर चक्क खुर्ची उचलून मारहाण करुन त्यांचे मंगळसूत्र सुध्दा खेचण्याचा प्रयत्न या घटनेत झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत 2 मुलांना नखाने ओरबाडे काढून त्यांच्यावर सुध्दा या हॉटेल व्यवसायिकासह कर्मचाऱ्यांना यांनी हल्ला चढवला. या घटनेसंदर्भात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नाश्ता करायला गेलेल्या मुंबईकर चाकरमान्यांना नामांकित हॉटेलमध्ये मारहाण झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. माणगावमधील जोशी वडेवाले हॉटेलमध्ये ही घटना ही घटना घडलीये. गर्भवती महिला आणि दोन लहान मुलांना मारहाण झाल्याने संताप व्यक्त केला जातोय. वड्यात मीठ जास्त झाल्याची विचारणा  केली होती. मात्र बदल्यात होटेल कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना मारहाण करण्यात आलीये. 


मला नवा फोन हवाय; पैशांची जुळवाजुळव झाली नसल्यानं पती हतबल, पुण्यात महिलेनं उचललं टोकाचं पाऊल


संपूर्ण महाराष्ट्र हादरवणारी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात एका विवाहीत महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. महिलेच्या आत्महत्येचं कारण ऐकल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मृत महिलेचं नाव शिवानी गोपाळ शर्मा असून ती 20 वर्षांची असल्याचं समोर आलं आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Pimpari Chichwad Crime: पिंपरीतील अजित पवारांच्या माजी नगरसेवकाला गोळीबार प्रकरणात अटक, हॉटेलमध्येच गोळीबार अन्...