Indian Cricket Team Coach: भारतीय क्रिकेट संघाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकासाठी बीसीसीआय (BCCI) लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू करू शकते. त्यानंतर राहुल द्रविडच्या जागी नवीन प्रशिक्षकाची निवड केली जाईल. याचदरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांचे वक्तव्य समोर आले आहे. 


जय शाह म्हणाले की, भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षकपदावर राहायचे असेल तर त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल. वास्तविक, राहुल द्रविडचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावर बीसीसीआय सचिव म्हणाले की, राहुल द्रविडचा कार्यकाळ फक्त टी-20 विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला आहे. राहुल द्रविड पुन्हा अर्ज करून प्रशिक्षक होऊ शकतो, हे त्याने काही हावभावांमध्ये स्पष्ट केले, पण त्याचवेळी परदेशी प्रशिक्षकाबाबतच्या अटकळांनाही त्यांनी नकार दिला नाही.






राहुल द्रविड पुन्हा प्रशिक्षक होणार? (BCCI to release advertisement for new coach soon)


क्रिकबझने जय शाह यांचा हवाला देत लिहिले आहे, आम्ही येत्या काही दिवसांत नवीन प्रशिक्षकासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करू. राहुल द्रविडचा कार्यकाळ केवळ टी-20 विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला आहे, म्हणजेच तो जूनपर्यंत भारतीय संघात राहणार आहे. तसेच, त्याला पुन्हा प्रशिक्षक व्हायचे असेल तर त्याला अर्ज करावा लागेल, तो तसे करू शकतो. राहुल द्रविडचा कार्यकाळ 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत होता, मात्र त्यानंतर तो टी-20 विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला. राहुल द्रविड प्रशिक्षकपदी असताना भारतीय संघाने वन-डे वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली होती.


संबंधित बातम्या:


'माझी भूमिका नव्हती...'; इशान अन् श्रेयसला करारातून कोणी काढले?, जय शहा यांनी नाव सांगितले!


Suryakumar Yadav Net Worth: महागड्या गाड्यांची आवड, मुंबईत आलिशान घर; गोलंदाजांना धू धू धुणाऱ्या सूर्यकुमार यादवची संपत्ती किती?


Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्स अजूनही प्ले ऑफच्या फेरीत पोहचू शकते; काय आहे समीकरण?, जाणून घ्या...