धर्मशाला :आयपीएलच्या  17 (IPL 2024) व्या पर्वातील 58 वी मॅच काल धर्मशाला येथे पार पडली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (Royal Challengers Bengaluru) पंजाब किंग्जवर (Punjab Kings) 60 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्जसाठी धर्मशालाचं मैदान पुन्हा अनलकी ठरलं. पंजाब किंग्ज आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलं आहे. मुंबई इंडियन्सनंतर प्लेऑफबाहेर जाणारी पंजाब किंग्ज दुसरी टीम ठरली आहे. मॅच संपल्यानंतर विराट कोहलीनं (Virat Kohli ) पंजाब किंग्जची मालक प्रीती झिंटा (Priety Zinta) हिची भेट घेतली. या भेटीत विराटनं प्रीती झिंटाला सॉरी म्हटल्याचा दावा केला जातोय.     


विराट कोहलीनं घेतली प्रीती झिंटाची भेट


पंजाब किंग्जनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीनं रजत पाटीदार, विराट कोहली आणि कॅमेरुन ग्रीन यांच्या फलंदाजीच्या जोरावर 7 विकेटवर  241 धावा केल्या होत्या. विराट कोहलीनं 47 बॉलमध्ये 92 धावांची खेळी केली. यामध्ये त्यानं 7 चौकार आणि 6 षटकार मारले.  


विराट कोहलीनं मॅच संपल्यानंतर पंजाब किंग्जच्या मालक प्रीती झिंटा यांची भेट घेतली. मीडिया रिपोर्टनुसार विराट कोहलीनं प्रीती झिंटा यांना सॉरी म्हटलं त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं. विराट कोहली आणि प्रीती झिंटा यांचा फोटो व्हायरल होत असून नेटकरी त्यावर कमेंट करत आहेत. 


पंजाब किंग्ज प्ले ऑफच्या शर्यतीबाहेर 


पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन संघ असे आहेत ज्यांना आयपीएलमध्ये एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. पंजाब किंग्जनं यंदाच्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली आहे. पंजाबनं आतापर्यंत 12 मॅचेस खेळल्या असून त्यापैकी 8 मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळं पंजाब किंग्ज मुंबई इंडियन्स पाठोपाठ आयपीएलच्या बाहेर गेली आहे. 


बंगळुरुच्या आशा कायम 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आयपीएलमध्ये दमदार कमबॅक केलं आहे. आरसीबीचा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. आरसीबीनं सलग चार मॅचमध्ये विजय मिळवत प्लेऑफच्या शर्यतीतील आपलं स्थान कायम ठेवलं आहे. आरसीबीच्या आता दोन मॅचेस शिल्लक आहेत. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वातील टीमच्या प्लेऑफच्या आशा कायम असून त्यांच्या प्रवेशाचं गणित इतर संघाच्या कामगिरीवर देखील अवलंबून आहे. 


दरम्यान, विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून ऑरेंज कॅप देखील त्याच्याकडे आहे. 


संबंधित बातम्या :


Virat Kohli : राइली रुसोचं एक नंबरी सेलिब्रेशन, विराट कोहलीचा दस नंबरी पलटवार, पाहा व्हिडीओ


Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात अहंकार, रोहित शर्मा अन् बुमराहचा दाखला देत एबी डी विलियर्सचा हल्लाबोल, म्हणाला...