Jay Shah On Shreyas Iyer and Ishan Kishan: काही महिन्यांपूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांना बीसीसीआयच्या करारातून काढण्यात आले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये संघासाठी न खेळल्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र याचदरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शहा ((Jay Shah) यांनी याबाबत खुलासा केला आहे. बीसीसीआय कोणताही निर्णय घेते, तेव्हा पहिले बोट बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याकडे दाखवले जाते. पण श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना केंद्रीय कराराच्या यादीतून वगळण्यात माझी कोणतीही भूमिका नव्हती, असं स्पष्टीकरण जय शहा यांनी केला आहे. 


जय शहा नेमकं काय म्हणाले?


माध्यमांशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, "तुम्ही सर्व कायदे वाचू शकता. मी फक्त बैठकांचे समन्वयन करतो. असे निर्णय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या हातात असतात. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना करारातून मुक्त केल्यावरही देशांतर्गत क्रिकेट खेळताना, निर्णयांची अंमलबजावणी करणे हे अजित आगरकर यांचे काम होते. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना बीसीसीआयच्या करारातून काढण्याचा निर्णय अजित आगरकर यांचा होता, असं जय शहा म्हणाले. मी फक्त एक संयोजक आहे. माझी भूमिका अमलात आणणे आहे. आणि आम्हाला संजू सॅमसनसारखे नवीन खेळाडू मिळाले आहेत, असंही जय शहा यांनी सांगितले.






जय शहा यांनी इशान अन् अय्यरसोबत केली होती चर्चा-


जेव्हा श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना भारतीय संघातून वगळण्यात आले होते. केंद्रीय कराराच्या यादीतून त्यांना वगळण्यात आल्यावर जय शहा यांनी दोन्ही खेळाडूंशी चर्चा केली होती. या संदर्भात माहिती देताना जय शहा म्हणाले, "हो, मी या दोघांशी बोललो. हे वृत्त प्रसारमाध्यमांमध्येही चालू होते."


इशान आणि अय्यर टी-20 विश्वचषक संघातून बाहेर-


इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी आयपीएल 2024 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. तरीही भारतीय संघात त्याचे पुनरागमन सध्यातरी दूरचे वाटते. टी-20 विश्वचषक संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. निवडकर्त्यांनी इशान किशनकडे दुर्लक्ष करून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवडले. तर श्रेयस अय्यर मधल्या फळीत फलंदाजी करतो, पण मधल्या फळीतील जागा संघात आधीच भरलेली आहे.


संबंधित बातम्या:


Suryakumar Yadav Net Worth: महागड्या गाड्यांची आवड, मुंबईत आलिशान घर; गोलंदाजांना धू धू धुणाऱ्या सूर्यकुमार यादवची संपत्ती किती?


Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्स अजूनही प्ले ऑफच्या फेरीत पोहचू शकते; काय आहे समीकरण?, जाणून घ्या...


IPL 2024 Rohit Sharma: मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये रडताना दिसला रोहित शर्मा; त्याला बघून चाहतेही भावूक, पाहा Video