Indian Cricket New Coach: भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. बीबीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने  बुधवारी भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच्या नियुक्तीला एकमताने मंजुरी दिली.  द्रविडच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी आनंद व्यक्त केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. 


IND vs AFG: भारतीय संघाचा अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर! पहिल्यांदाच स्पर्धेत 200 हून अधिकचा स्कोर


टी-20 विश्वचषकानंतर भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यानंतर राहुल द्रविड भारतीय संघाला मार्गदर्शन करणार आहेत. भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. राहुल द्रविड 2023 पर्यंत संघाचे मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी संभाळणार आहेत. याचबरोबर पारस म्हाम्ब्रे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 


Martin Guptill Record: मार्टिल गप्टिलची विक्रमाला गवसणी, टी-20 क्रिकेटमध्ये 3000 धावा करणारा ठरला दुसरा खेळाडू


राहुल द्रविड सध्या बंगळरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यांनी 2016 पासून अंडर-19 टीमचा प्रशिक्षक म्हणून काम केले. त्याच्या मार्गदर्शनात भारताने सलग दोन वेळा अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये स्थान मिळवले. तर, 2018 मध्ये अंडर-19 संघाने विश्वचषकावर आपले नाव देखील कोरले. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली मयंक अग्रवाल, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत सारखे खेळाडू तयार झाले आहेत.


द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 79 वनडे आणि 25 कसोटी सामने खेळले होते. या सामन्यांपैकी 50 टक्के सामने भारताने जिंकले होते. द्रविड यांचे भारतीय संघाला  सर्वश्रेष्ठ बनवण्याचे स्वप्न होते, भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी एका मुलाखतीत सांगतिले होते.