ICC T20 WC 2021, IND vs AFG Preview:  टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) भारताची सुरुवात खराब झाली. या स्पर्धेत भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्कारावा लागला. ज्यामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा धुसूर झाल्यात. भारतीय संघासाठी त्यांच्या पुढील सामन्यात चांगली कामगिरी करून दाखवणे आवश्यक आहे.  दरम्यान, भारताचा संघ आज शेख जायद मैदानात अफगाणिस्तानशी (IND vs AFG) भिडणार आहे. या स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघाने आतापर्यंत दोन सामन्यात विजय मिळवला आहे. टी-20 विश्वचषकात दोनदा आमने- सामने आले आहेत. या सामन्यात कोणत्या संघाचे पारडे जड राहिले? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.  


IND vs AFG: आज भारत-अफगाणिस्तानचा 'करो या मरो' सामना, कधी आणि कुठे पाहता येणार?


भारत आणि अफगाणिस्तान आज तिसऱ्यांदा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आमने- सामने येणार आहेत. यापूर्वी 2010 टी-20 विश्वचषक आणि 2012 टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झालाय. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. अफगाणिस्तानच्या संघाने 2010 मध्ये भारताविरुद्धच टी-20 विश्वचषकात पदार्पण केले. या सामन्यात भारताने 7 विकेट्स राखून अफगाणिस्तानच्या संघाला मात दिली. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानच्या संघाला 23 धावांनी पराभूत केले. परंतु, या स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. तर, अफगाणिस्तानने उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रभावित केलंय. 


T20 World Cup : विराटसारखा फिट नाही म्हणून काय झालं, त्याच्यापेक्षा लांब षटकार ठोकतो, अफगाणिस्तानच्या फलंदाजाच्या चर्चा


यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारताने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सलग दोन पराभवामुळे भारत गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. तर, भारताचा रनरेट -1.609 इतका आहे. तर, आफगाणिस्तानने आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी दोन सामने जिंकले आहेत. तर, एका सामन्यात त्यांचा पराभव झाला. अफगाणिस्तानचे 4 गुण झाले असून त्यांचा रनरेट 3.097 इतका आहे. 


IND vs AFG: आज हरलो तर भारताची सेमीफायनलची शर्यत संपणार, जिंकलो तरी 'ही' गणितं महत्वाची


भारत संभाव्य संघ-
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह.


अफगाणिस्तान संभाव्य संघ-
हजरतुल्ला झाझाई, मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), रहमानउल्ला गुरबाज, उस्मान घनी, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी (कर्णधार), गुलबदिन नायब, रशीद खान, करीम जनात/मुजीब उर रहमान, हमीद हसन आणि नवीन-उल- हक.