New Zealand vs Scotland: टी-20 विश्वचषक 2021 च्या सुपर-12 फेरीत बुधवारी न्यूझीलंड आणि स्कॉटलंड (New Zealand vs Scotland) यांच्यात सामना रंगला. या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल (Martin Guptill) आक्रमक खेळी केली. त्याने 56 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांसह 93 धावांची खेळी केली. मार्टिन गप्टीलचे केवळ 7 धावांनी शतक हुकले असले तरी, त्याने या सामन्यात दोन नव्या विक्रमाला गवसणी घातली. 


ICC T20 WC 2021, IND vs AFG Preview: टी-20 विश्वचषकात भारत- अफगाणिस्तान तिसऱ्यांदा आमने-सामने, कोणाचे पारडे जड?


गुप्टिलने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला.  टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा मार्टिन गप्टील पहिला फलंदाज ठरला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाच्या यादीत मार्टिन गप्टिल सातत्याने आघाडीवर आहे. या यादीत भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 134 षटकार मारले आहेत. तर, वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल 122 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा इयॉन मार्गन आणि पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कॉलिन मनरो आहे. इयॉनच्या नावावर 199 तर, मनरो 107 षटकारांसह पाचव्या स्थानी आहे. 


IND vs AFG: आज भारत-अफगाणिस्तानचा 'करो या मरो' सामना, कधी आणि कुठे पाहता येणार?


या सामन्यात मार्टिन गप्टीलने 150 षटकारांसह आणखी एक विक्रम त्याच्या नावावर केला. या सामन्यात त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 धावांचा टप्पा पूर्ण केला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनंतर मार्टिल गप्टिल अशी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू ठरला. कोहलीने 91 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 52.02 च्या सरासरीने आणि 137.94 च्या स्ट्राइक रेटने 3225 धावा केल्या आहेत. यात 29 अर्धशतकांचा समावेश आहे. तर,गुप्टिलने 105 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.65 च्या सरासरीने आणि 136.95 च्या स्ट्राइक रेटने 3069 धावा केल्या आहेत. यात 2 शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. 


ICC T20I Rankings: बाबर आझम जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज; यादीत केवळ दोन भारतीयांचा समावेश


आयसीसी टी-20 विश्वचषकातील गट 2 च्या सामन्यात आज न्यूझीलंडने स्कॉटलंडचा 16 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडच्या या विजयामुळे भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आणखी धुसूर झाल्या.