Ravichandran Ashwin Century India vs Bangladesh 1st Test Day-1 : चेन्नई येथे बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल हे भारतीय दिग्गज फेल ठरले, तर यशस्वी जैस्वालने 56 धावांची खेळी केली. प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतनेही चांगला प्रयत्न करत संघासाठी 39 धावा केल्या, मात्र पहिल्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अश्विनने अप्रतिम कामगिरी करत शानदार फलंदाजी करत शतक ठोकले.
आर अश्विनचे कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे. दमदार फलंदाजी करत अश्विनने कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. महत्त्वाची बाब म्हणजे हा सामना पाहण्यासाठी त्याचे वडीलही चेपॉक स्टेडियमवर आले आहेत. अश्विनने 108 चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले. त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीतील अश्विनचे पहिले शतक
आर अश्विनने बांगलादेशविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच शतक झळकावले आणि भारतीय भूमीवरील कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे चौथे शतक ठरले. या शतकापूर्वी अश्विनने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये एक शतक आणि वेस्ट इंडिजविरुद्ध चार शतके झळकावली होती. या सामन्यात भारताच्या 6 विकेट 144 धावांच्या स्कोअरवर पडल्या होत्या आणि त्यानंतर अश्विनने रवींद्र जडेजासोबत सातव्या विकेटसाठी अप्रतिम भागीदारी केली आणि भारताला मजबूत धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
जडेजा-अश्विन जोडीने टीम इंडियाला तारले
बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत भारताची सुरुवात खराब झाली होती. टीम इंडियाने पहिल्या डावात 144 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. मात्र यानंतर अश्विन आणि जडेजाने पदभार स्वीकारला. या दोन्ही बातम्या लिहिपर्यंत 185 धावांची भागीदारी पूर्ण झाली होती. जडेजा 102 चेंडूत 79 धावा करून खेळत होता. जडेजाने 10 चौकार आणि 2 षटकार मारले होते.
चेन्नईत अश्विनचे मोठे विक्रम
अश्विनच्या नावावर चेन्नईत आतापर्यंत मोठे रेकॉर्ड आहे. फलंदाजीसोबतच गोलंदाजीमध्येही तो भारतासाठी फायदेशीर ठरला आहे. चेन्नईतील या कसोटीपूर्वी, येथे सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या सध्याच्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर होता. तर विराट पहिल्या क्रमांकावर होता. मात्र या सामन्यात विराट 6 धावा करून बाद झाला.
हे ही वाचा -