Yuvraj Singh Pavellion in Mohali : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) यांच्यात सुरु तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय मैदानात सुरु आहे. या सामन्यापूर्वीच पंजाब क्रिकेटकडून भारतीय संघाचे माजी खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांना मोठी भेटवस्तू दिली आहे. मैदानात दोघांची नावं पॅव्हेलियनला देण्यात आली आहेत.
भज्जी आणि युवीला खास गिफ्ट
पंजाब क्रिकेट असोसिएशनने पॅव्हेलियनला युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांचे नाव देत दोघांनाही एक मोठी भेट दिली आहे. युवराज आणि हरभजन हे दोघेही भारताने जिंकलेल्या 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या विजयी भारतीय संघाचे सहभागी आहेत. दोघांनी या स्पर्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2011 विश्वचषकाचा हिरो असणारा युवराज मालिकावीरही होता. तर हरभजन भारतासाठी विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत टॉप खेळाडूंमध्ये आहे. दोघेही पंजाब राज्याचे खेळाडू असून भारतीय क्रिकेटसाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांची नावं पॅव्हेलियनला देण्यात आली आहेत. दरम्यान आज झालेल्या स्टेडियममधील पॅव्हेलियनच्या नावाच्या उद्घाटनावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह स्वतः तेथे उपस्थित होता. पीसीएने स्टेडियममधील टेरेस ब्लॉकचे नाव हरभजनच्या नावावर ठेवले आहे तर स्टेडियमच्या नॉर्थ पॅव्हेलियनला युवराज सिंहचे नाव दिले आहे.
ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे आव्हान
सामन्यात सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला स्वस्तात सर्वबाद करण्याची रणनीती कांगारुनी आखली होती. त्या हेतूने त्यांची सुरुवातही चांगली झाली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (11), माजी कर्णधार विराट कोहली (2), दोघेही स्वस्तात तंबूत परतले. पण त्यानंतर क्रिजवर आलेल्या सूर्यकुमार यादवने केएल राहुलसोबत डाव सावरला. दोघांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या 100 पार नेली. पण अर्धशतक करुन राहुल 55 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दीक पंड्या क्रिजवर आल्यावर त्यानेही चांगली फलंदाजी केली. पण तोवर सूर्या 46 धावा करुन बाद झाला. मग हार्दीकने एकहाती तुफान फलंदाजी करत 30 चेंडूत नाबाद 71 धावा ठोकल्या आणि धावसंख्या 208 पर्यंत नेत ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे आव्हान ठेवले आहे.
हे देखील वाचा-