UP Saharanpur Video : यूपीच्या (UP) सहारनपूरमध्ये (Saharanpur) कबड्डी टूर्नामेंट दरम्यान खेळाडूंना टॉयलेटमध्ये (Kabaddi Players) जेवण वाढल्याचा अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. उत्तरप्रदेशमधील सहारनपूरमध्ये तीन दिवसीय राज्यस्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये खेळाडूंना वाढण्यासाठीचे जेवण तयार करून ते शौचालयात ठेवण्यात आले होते.  स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे 200 खेळाडूंना हेच जेवण देण्यात आलं. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर समोर आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच संबधित क्रिडा अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान नेटकरी मात्र चांगलेच संतप्त झाल्याचं दिसून येत आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे 200 खेळाडूंना हेच जेवण देण्यात आलं असून खेळाडूंना दिलेला भातही अर्धवट शिजवून दिला होता. युपीच्या सहारनपूरमध्ये तीन दिवसीय सब ज्युनियर गर्ल्स कबड्डी स्पर्धा आयजिच करण्यात आली होती, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी (16 सप्टेंबर) खेळाडूंसोबत ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. दरम्यान काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करत युपीमध्ये सरकार असलेल्या भाजपा सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसने ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'उत्तर प्रदेशातील कबड्डी खेळणाऱ्या मुलींना शौचालयात जेवण देण्यात आले.खोट्या प्रचारावर करोडो रुपये खर्च करणाऱ्या भाजप सरकारकडे आमच्या खेळाडूंसाठी चांगली व्यवस्था करायला पैसे नाहीत. धिक्कार असो!'


व्हिडीओ व्हायरल होताच कारवाई


समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी जिल्हा खेळ अधिकारी अनिमेष सक्सेनाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. ही माहिती अप्पर मुख्य सचिव खेळ नवनीत सेहगल यांनी दिली. सोबतच राज्य सरकारने एडीएम वित्त आणि राजस्व रजनीश कुमार मिश्र यांना या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. 


हे देखील वाचा -