India vs Australia Toss Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia ) यांच्यात आजपासून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. आज मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर पहिला टी20 सामना पार पडत आहे. नुकतीच नाणेफेक पार पडली असून ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील आजा पहिलाच सामना असल्याने दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.






कसे आहेत दोन्ही संघ?


विश्वचषकापूर्वी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या मालिकेत भारतीय संघाचा विचार करता जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत या दोन्ही दिग्गज खेळाडूंना विश्रांती देत संघाबाहेर ठेवलं आहे. विशेष म्हणजे अनुभवी गोलंदाज उमेश यादव जवळपास 43 महिन्यानंतर आंतरराष्ट्री टी20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. दिनेश कार्तिक हा देखील संघात आहे. हर्षल पटेलने दुखापतीनंतर पुनरागमन केलं आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघात टीम डेव्हीड फायनली पदार्पण करत आहे. तर नेमकी दोन्ही संघाची अंतिम 11 कशी आहे ते पाहूया... 


भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, उमेश यादव


ऑस्ट्रेलिया संघ - आरोन फिंच (कर्णधार), जोस इंगलिस, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेविड, कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, पॅट कमिन्स, जोस हेजलवुड, नथन एलिस.


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापंर्यंत 23 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय. त्यात आजचा सामना विश्वचषकापूर्वी दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असल्याने या सामन्याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


हे देखील वाचा-