Prithvi Shaw Knee Injury: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. पण यादरम्यान पृथ्वी डोमेस्टीक क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवत आहे. पृथ्वी इंग्लंडच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्येही खेळत होता. त्यानं नॉर्थम्पटनशायरसाठीही क्रिकेट खेळलं आहे. परंतु, या दरम्यान पृथ्वी शॉला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. पृथ्वीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे पृथ्वी शॉला आता मैदानापासून बराच काळ दूर राहावं लागणार आहे. 


इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या एका वृत्तानुसार, पृथ्वी शॉला तीन-चार महिन्यांसाठी क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागू शकतं. इंग्लंडच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये नॉर्थम्पटनशायरकडून खेळताना एका वनडे दरम्यान, पृथ्वीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. पृथ्वीला ऑगस्टमध्ये दुखापत झाली होती. दरम्यान, इंग्लंडच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळताना पृथ्वीनं धमाकेदार खेळी करत आपली छाप सोडली होती. या सामन्यात पृथ्वीनं दुहेरी शतक झळकावलं होतं.  


BCCI नं पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच, पृथ्वी तीन ते चार महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर राहणार असून त्यादरम्यान तो रिहॅबमध्ये राहणार असल्याचंही BCCI च्या सुत्रांनी माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं बोलताना सांगितलं की, पृथ्वी शॉच्या गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर एमआरआय करण्यात आला. त्याच्या रिपोर्टमधून पृथ्वीला लिगामेंट इंजरी झाल्याचं समजलं आहे. पृथ्वीची सर्जरी होणार की नाही, याबाबत मात्र अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही. 


दरम्यान, पृथ्वी शॉनं नॉर्थम्पटनशायरकडून खेळताना एका सामन्यात नाबाद 125 धावा केल्या होत्या. त्यापूर्वी पृथ्वीनं 244 धावांची शानदार खेळी केली होती. पृथ्वी 2021 पासूनच टीम इंडियापासून दूर आहे. त्यानं टीम इंडियासाठी शेवटचा सामना श्रीलंकेविरोधात जुलै 2021 मध्ये खेळला होता. तेव्हापासून पृथ्वी शॉ कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तसेच, पृथ्वी शॉनं शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाच्याविरोधात खेळला होता. 


पृथ्वी शॉनं टीम इंडियासाठी 5 कसोटी सामन्यांमध्ये 339 धावा केल्या आहेत. यादरम्यान एक शतक आणि दोन अर्धशतक झळकावली आहेत. तसेच, पृथ्वी शॉ 6 वनडे सामनेही खेळला आहे. त्यासोबतच एक टी20 सामनाही खेळला आहे. त्यानं फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 78 डावांत 3802 धावा केल्यात.यादरम्यान 12 शतक आणि 16 अर्धशतक लगावली आहेत. पृथ्वी शॉ एके 57 सामन्यांमध्ये 3056 धावा केल्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


India vs Sri Lanka: ...अन् टीम इंडिया चक्क श्रीलंकेच्या स्पिनर्ससमोर ढेपाळली; इतिहासात पहिल्यांदाच रचलाय लाजिरवाणा रेकॉर्ड