(Source: Poll of Polls)
IND vs NZ, 2nd T20 : दुसऱ्या टी20 मध्ये तरी पृथ्वी शॉला संधी मिळणार? पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा T20 सामना आज लखनौ येथे खेळवला जाणार आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल.
IND vs NZ, 2nd T20 Proabable 11 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज सायंकाळी होणार आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री. अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. दरम्यान पहिला सामना गमावल्यामुळे या सामन्यात टीम इंडियावर विजयाचं दडपण नक्कीच असणार आहे, मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकावाच लागेल. अशामध्ये भारतीय संघात काही बदल देखील नक्कीच होऊ शकतात.
पृथ्वी शॉला संधी मिळण्याची शक्यता
बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन केलेल्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला पहिल्या सामन्यात अंतिम 11 मध्ये जागा मिळाली नव्हती. त्यात पहिल्या टी20 मध्ये भारताने अत्यंत खराब फलंदाजी केली, ज्यामुळे सामना 12 धावांनी भारताला गमवावा लागला. अशामध्ये दुसऱ्या सामन्यात मात्र पृथ्वीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यात पहिल्या सामन्यात भारताने बरेच गोलंदाज खेळवले होते. त्यामुळे आज वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) प्लेईंग इलेव्हनमधून (Team India Playing 11) बाहेर राहू शकतो. टीम इंडिया त्याच्या जागी एका अतिरिक्त फलंदाजाला संधी देऊ शकते. त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यात पृथ्वी इन आणि उमरान आऊट होऊ शकतो. रांचीमध्ये टीम इंडियामध्ये एक फलंदाज कमी खेळला गेला. तसंत उमराननं या सामन्यात बऱ्यात धावा दिल्या. रांचीमध्ये उमरानकडून कर्णधार हार्दिक पांड्याने फक्त एकच षटक टाकले. या षटकात त्याने 16 धावा दिल्या. गेल्या काही सामन्यांमध्ये पाहिले तर उमरान बऱ्याच धावा देत आहे, मागील तीन सामन्यांमध्ये त्याने सरासरी 10 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याच्या जागी एका अतिरिक्त फलंदाजाला संधी देऊ शकते.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन:
भारत : हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब टफी, ब्लेअर टिकनर.
हे देखील वाचा-