एक्स्प्लोर

Prithvi Shaw: पृथ्वी शॉ महाराष्ट्राच्या संघात सामील; भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने मोठा निर्णय

Prithvi Shaw: पृथ्वी शॉने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

Prithvi Shaw: भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि युवा स्टार पृथ्वी शॉ याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निरोप घेत, आगामी हंगामापासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून, महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाची ताकद यामुळे अधिक बळकट होणार आहे.

पृथ्वी शॉने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचप्रमाणे, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने सातत्यपूर्ण व भरीव कामगिरी करत स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शॉच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ साली अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १३ शतके आणि ४५०० हून अधिक धावा आहेत.

पृथ्वी शॉ काय म्हणाला?

आपल्या निर्णयाविषयी बोलताना पृथ्वी शॉ म्हणाला, "कारकिर्दीतील या वळणावर मी एक क्रिकेटपटू म्हणून स्वतःची वाढ आणि विकासासाठी महाराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आजवर मला मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल मी पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी राज्यभर विशेष प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग, वुमन्स एमपीएल, कॉर्पोरेट शील्ड, डी. बी. देवधर ट्रॉफी यांसारखे उपक्रम ही त्याची साक्ष आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की, अशा प्रेरणादायी वातावरणात खेळल्याने माझ्या कारकिर्दीला नवे वळण मिळेल व क्रिकेटपटू म्हणून अधिक प्रगती करू शकेन. तसेच ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, रजनीश गुर्बानी आणि मुकेश चौधरी यांसारख्या गुणवान खेळाडूंसोबत महाराष्ट्र संघात खेळण्याची संधी मिळेल, याचा मला आनंद आहे."

रोहित पवार काय म्हणाले?

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, "भारतीय संघाचे सर्व फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केलेला स्टार खेळाडू पृथ्वी शॉ यांनी महाराष्ट्र संघात खेळण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो. आमच्या संघात ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, मुकेश चौधरी, रजनीश गुरबाणी यांसारखे अनुभवसंपन्न व नवोदित खेळाडू आहेत. अशा वेळी पृथ्वी शॉसारख्या ऑल-फॉरमॅट खेळाडूची भर पडल्यामुळे महाराष्ट्र संघ अधिक भक्कम होईल, याची आम्हाला खात्री आहे. पृथ्वी शॉने आतापर्यंत भारतीय संघात व आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याचा अनुभव व आक्रमक खेळ नव्या पिढीच्या क्रिकेटपटूंना मार्गदर्शक ठरेल. पृथ्वी शॉ याला महाराष्ट्र संघात सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आमच्या अपेक्स कमिटी आणि सीएसी कमिटीचे आभार मानतो. तसेच त्याच्या आगामी कारकिर्दीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पूर्णपणे पाठीशी उभा राहणार आहे."

डी. बी. देवधर स्पर्धेतही पृथ्वी शॉ सहभागी होण्याची शक्यता-

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने अलिकडच्या काळात विविध स्पर्धा व उपक्रमांद्वारे राज्यातील क्रिकेटची व्याप्ती वाढवण्याचे कार्य हाती घेतले आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांनी नव्या क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून दिले आहे. याच पार्श्वभूमीवर पृथ्वी शॉचा महाराष्ट्र संघात समावेश होणे, हे राज्याच्या क्रिकेटसाठी एक नवे पर्व ठरेल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डी. बी. देवधर टूर्नामेंट या दर्जेदार स्पर्धेतही पृथ्वी शॉ सहभागी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या स्पर्धेच्या दर्जात अधिक भर पडेल.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Pune Election 2026 Ravindra Dhangekar: ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
कल्याण डोंबिवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर
कल्याण डोंबिवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
Embed widget