Prithvi Shaw in Team India : भारताचा युवा, स्फोटक सलामीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) आपल्या दमदार कामगिरीने सर्वांची मनं जिंकली होती. त्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. पण पृथ्वी सध्या भारतीय संघाबाहेर असून काही काळापासून खास फॉर्मात नसल्याने त्याला संघाबाहेर ठेवलं आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केल्यावर आता भारत आणि श्रीलंका यांच्यात नववर्षानिमित्त होणाऱ्या मालिकेसाठीही त्याचा संघात समावेश होईल असं वाटत होतं. पण त्याला टी20 आणि एकदिवसीय दोन्ही संघात स्थान न मिळाल्याने शॉ चे चाहते निराश झाले आहेत.


पृथ्वी शॉ जुलै 2021 पासून भारतीय संघाबाहेर आहे आणि जवळपास दीड वर्षानंतरही तो पुनरागमन करू शकलेला नाही. जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्याच वेळी, शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने खेळला. पृथ्वीने भारतासाठी 6 वनडे आणि 5 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र सध्याच्या कामगिरीने तो निवडकर्त्यांना प्रभावित करू शकलेला नाही. शॉवर अन्याय होत असल्याचं संघाचा फलंदाज पृथ्वीच्या चाहत्यांचं मत आहे. पृथ्वीबाबत चाहत्यांनी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला संघात न घेण्याचे कारणही बीसीसीआयला विचारले आहे.


























शॉ संघात पुनरागमनासाठी घेतोय मेहनत


पृथ्वी शॉ एक स्फोटक सलामीवीर म्हणून टीम इंडियामध्ये आपली भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतो. शॉ सलामीला येऊन झटपट धावा करण्यासाठी ओळखला जातो. केएल राहुलच्या जागी पृथ्वी शॉला संघात संधी दिली जाऊ शकते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो चांगली कामगिरी करत आहे. शॉ गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फिटनेसवर देखील सतत काम करताना दिसत आहे. आयपीएल 2022 पासून त्याने 7-8 किलो वजन कमी केल्याचे समोर आले आहे.


हे देखील वाचा-