Team India for IND vs SL Series : भारतीय संघ (Team India) 2023 वर्षांची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध सामन्यांनी करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दरम्यान टी20 विश्वचशषकात पराभवानंतर आता श्रीलंकेविरुद्ध या टी20 मालिकेत भारतीय संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. या संघात सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल आणि माजी कर्णधार विराट कोहली बाहेर  असू शकतात. तसंच रोहितच्या दुखापतीमुळे अष्टपैलू हार्दिक पांड्याला संघाची कमान सोपवली जाऊ शकते.

शॉ-त्रिपाठीला मिळू शकते संधी

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आणि मधल्या फळीतील फलंदाज राहुल त्रिपाठी यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉने 2021 मध्ये भारतासाठी पहिला आणि शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आता पुन्हा एकदा त्याला भारताच्या T20 संघात स्थान मिळू शकते. पृथ्वी शॉने IPL मध्ये 147.45 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्यामुळे एक सलामीवीर म्हणून तो टीम इंडियामध्ये आपली भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतो. शॉ सलामीला येऊन झटपट धावा करण्यासाठी ओळखला जातो. केएल राहुलच्या जागी पृथ्वी शॉला संघात संधी दिली जाऊ शकते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो चांगली कामगिरी करत आहे. शॉ गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फिटनेसवर देखील सतत काम करताना दिसत आहे. आयपीएल 2022 पासून त्याने 7-8 किलो वजन कमी केल्याचे समोर आले आहे.

दुसरीकडे या मालिकेत विराट कोहलीच्या जागी राहुल त्रिपाठी संघात सामील होऊ शकतो. या मालिकेसाठी कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते. अशा स्थितीत राहुल त्रिपाठी फायनली संघात पदार्पण करू शकतो. राहुल त्रिपाठीला याआधी संघात स्थान मिळालं आहे, पण अंतिम 11 मध्ये जागा न मिळाल्याने तो अद्याप पदार्पण करू शकलेला नाही. 2022 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला पहिल्यांदा भारतीय संघाचा भाग बनवण्यात आलं होते, पण त्या मालिकेत तो पदार्पण करू शकला नाही. 

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांचं वेळापत्रक

एकदिवसीय मालिका-

सामना तारीख ठिकाण वेळ
पहिला एकदिवसीय सामना 3 जानेवारी  वानखेडे स्टेडियम, मुंबई  सायंकाळी 7 वाजता
दुसरा एकदिवसीय सामना 5 जानेवारी  एमसीए स्टेडियम, पुणे सायंकाळी 7 वाजता
तिसरा एकदिवसीय सामना 7 जानेवारी  सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट सायंकाळी 7 वाजता

टी20 मालिका-

सामना तारीख ठिकाण वेळ
पहिला टी20 सामना 10 जानेवारी  बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी  दुपारी 2 वाजता
दुसरा टी20 सामना 12 जानेवारी  ईडन गार्डन्स, कोलकाता दुपारी 2 वाजता
तिसरा टी20 सामना 15 जानेवारी 

ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम

दुपारी 2 वाजता

हे देखील वाचा-