India vs West Indies Virat Kohli : माजी कर्णधार विराट कोहलीला गेल्या काही दिवसांपासून आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. वेस्ट इंडिजविरोधातील एकदिवसीय मालिकेतही विराट कोहलीने निराशाजनक कामगिरी केली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली शून्य धावसंख्येवर बाद झाला, त्यामुळे चाहत्यांचा पारा चांगलाच चडला. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली.


पहिल्या दोन एकदिवसीय सामन्याप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही विराट कोहली स्वस्तात माघारी परतला. विराट कोहली शून्य धावसंख्यावर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. विविध प्रकारच्या मीम्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.  काही नेटकऱ्यांनी मीम्समधून विराटची पत्नी अनुष्का शर्मालाही टार्गेट केलं.


पाहा मीम्स - 






















विराट कोहलीचं खराब प्रदर्शन – 
माजी कर्णधार विराट कोहलीला वेस्ट विंडिजविरोधात आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. तीन सामन्यात विराट कोहलीला फक्त 26 धावाच करता आल्या. म्हणजे तीन सामन्यात विराट कोहलीने 8.67 सरासरीने धावा काढता आल्या. विराट कोहलीची एकदिवसीय सामन्यातील सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. 


विराट कोहलीच्या नावावर झाला लाजीरवाणा विक्रम -
अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीला धावांचे खातेही उघडता आले नाही.  विराट कोहली शून्य धावसंख्येवर बाद झाला. विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद जाली आहे.  आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा शून्य धावसंख्यावर (फलंदाजी एक ते सात यादरम्यान) बाद होणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत विराट कोहली 32 वेळा शून्य धावसंख्येवर बाद झालाय. विराट कोहलीने माजी फलंदाज विरेंद्र सेहवागचा विक्रम मोडीत काढला आहे. सेहवाग आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 31 वेळा शून्य धावसंख्यावर बाद झालाय.  विराट कोहलीने लाजीरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर विराट कोहलीवर टीकाही होत आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक वेळा शून्य धावसंख्यावर होणारा फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. तिसऱ्य एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. विराट कोहलीला अल्जारी जोसेफने (Alzarri Joseph) बाद केलं.  विराट कोहलीने दोन चेंडूचा सामना केला, पण एकही धाव काढता आली नाही.