Cricket Australia : टीम पेन कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रलियाची कसोटी नेतृत्वाची धुरा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्याकडे सोपवली आहे. तर उपकर्णधार म्हणून स्टिव्ह स्मिथ याची निवड करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात तब्बल 65 वर्षांनंतर संघाचं नेतृत्व एका गोलंदाजाकडे गेलं आहे. महान वेगवान गोलंदाज रिची बेनो यांच्यानंतर तब्बल 65 वर्षानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व एका गोलंदाजांकडे आलं आहे. पॅट कमिन्स हा 47 वा ऑस्ट्रेलियन कर्णधार झालाय. पुढील महिन्यात होणाऱ्या अॅशेस मालिकेपासून पॅट कमिन्स कर्णधारपद तर स्टिव्ह स्मिथ उपकर्णधारपद साभांळणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (CA) पांच सदस्यीय निवड समितीने कमिन्स आणि स्मिथ यांची निवड केली.एका अहवालानुसार, ऑस्ट्रेलियन मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर (Justin Langer)यांनी स्टीव्ह स्मिथला उपकर्णधार आणि पॅट कमिन्सला कर्णधार म्हणून निवडण्याची सूचना केली होती. त्यानुसार, या स्मिथ-कमिन्स यांच्या निवडीवर विचार करण्यात आल्याचं समजतेय.
टीम पेन यानं का दिला राजीनामा –
महिला सहकाऱ्याला अश्लिल मेसेज आणि फोटोज पाठवल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने राजीनामा दिला. त्यामुळे आगामी अॅशेस मालिकेसाठी कर्णधारपद कुणाकडे जाणार याची चर्चा होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं गोलंदाज पॅट कमिन्स याची निवड केली आहे.
कमिन्सची कारकिर्द –
28 वर्षांच्या पॅट कमिन्सने आतापर्यंत 34 कसोटी सामन्यात 21 सरासरीने 164 विकेट्स घेतल्या आहेत. पॅट कमिन्स आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
स्मिथ उपकर्णधार -
आघाडीचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ याआधी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार होता. पण 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत सामन्यात बॉल टेम्परिंगनंतर कर्णधारपद काढून घेतलं होतं. त्यानंतर आता त्याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
संबधित बातम्या :
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियातील वर्ल्डकपची फायनल मेलबर्नमध्ये, पाहा कुठे किती होणार सामने
अॅशेस मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला धक्का; टिम पेनने सोडले कर्णधारपद, 'Sexting'प्रकरण भोवले