एक्स्प्लोर

Cricket Australia  : ऑस्ट्रेलियाने 65 वर्षांनी निर्णय बदलला, नवा कर्णधार निवडला!

Cricket Australia  : महिला सहकाऱ्याला अश्लिल मेसेज आणि फोटोज पाठवल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने राजीनामा दिला

Cricket Australia  : टीम पेन कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रलियाची कसोटी नेतृत्वाची धुरा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याच्याकडे सोपवली आहे. तर उपकर्णधार म्हणून स्टिव्ह स्मिथ याची निवड करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात तब्बल 65 वर्षांनंतर संघाचं नेतृत्व एका गोलंदाजाकडे गेलं आहे. महान वेगवान गोलंदाज रिची बेनो यांच्यानंतर तब्बल 65 वर्षानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व एका गोलंदाजांकडे आलं आहे. पॅट कमिन्स हा 47 वा ऑस्ट्रेलियन कर्णधार झालाय. पुढील महिन्यात होणाऱ्या अॅशेस मालिकेपासून पॅट कमिन्स कर्णधारपद तर स्टिव्ह स्मिथ उपकर्णधारपद साभांळणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (CA) पांच सदस्यीय निवड समितीने कमिन्स आणि स्मिथ यांची निवड केली.एका अहवालानुसार, ऑस्ट्रेलियन मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर (Justin Langer)यांनी स्टीव्ह स्मिथला उपकर्णधार आणि पॅट कमिन्सला कर्णधार म्हणून निवडण्याची सूचना केली होती. त्यानुसार, या स्मिथ-कमिन्स यांच्या निवडीवर विचार करण्यात आल्याचं समजतेय.

टीम पेन यानं का दिला राजीनामा –
महिला सहकाऱ्याला अश्लिल मेसेज आणि फोटोज पाठवल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने राजीनामा दिला. त्यामुळे आगामी अॅशेस मालिकेसाठी कर्णधारपद कुणाकडे जाणार याची चर्चा होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं गोलंदाज पॅट कमिन्स याची निवड केली आहे.

कमिन्सची कारकिर्द –
28 वर्षांच्या पॅट कमिन्सने आतापर्यंत 34 कसोटी सामन्यात 21 सरासरीने 164 विकेट्स घेतल्या आहेत.  पॅट कमिन्स आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.

स्मिथ उपकर्णधार -
आघाडीचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ याआधी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार होता. पण 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत सामन्यात बॉल टेम्परिंगनंतर कर्णधारपद काढून घेतलं होतं. त्यानंतर आता त्याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 

संबधित बातम्या :

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियातील वर्ल्डकपची फायनल मेलबर्नमध्ये, पाहा कुठे किती होणार सामने
अॅशेस मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला धक्का; टिम पेनने सोडले कर्णधारपद, 'Sexting'प्रकरण भोवले

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Netherlands Captain News : वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget