IND vs AUS, Hardik Pandya Tweet : ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या टी20 सामन्यात 4 विकेट्सने मात दिली. या सामन्यानंतर स्टार अष्टपैलू हार्दीकने सामन्यातील एक फोटो शेअर करत पराभवातून 'आम्ही शिकू आणि आणखी सुधार करु अशा आशयाचं ट्वीट केलं.'या ट्वीटची पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी हिने खिल्ली उडवली, ज्यानंतर मात्र भारतीय चाहत्यांनी तिलाच ट्रोल करत तिचीच खिल्ली उडवली. 


तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही टी20 मालिका भारतात सुरु आहे. यातील पहिल्या सामन्यात भारताने 209 धावांचे तगडे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवले, पण कांगारुंनी 4 गडी आणि 4 चेंडू राखून सामना जिंकला. ज्यानंतर सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या हार्दीक पंड्याने खिलाडूवृत्तीने एक ट्वीट केलं. त्याने लिहिलं, ''आम्ही यातून शिकू आणि आणखी सुधारणा करु, आम्हाला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचं खूप खूप धन्यवाद'' दरम्यान हार्दीकच्या या ट्वीटवर पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी हिने कमेंट करत लिहिले की,''23 ऑक्टोबरला विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानकडूनही पराभूत व्हा, म्हणजे आणखी शिकाल''. सेहरच्या या ट्रोल करणाऱ्या कमेंटनंतर भारतीय चाहत्यांनी तिलाच ट्रोल करत अनेक मजेशीर कमेंट केल्या...यातील काही खास पोस्ट पाहू...


हार्दीकच्या ट्वीटवर सेहरची कमेंट






भारतीय चाहत्यांनी केलं ट्रोल














भारत 4 विकेट्सनी पराभूत


सामन्यात सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा (11), माजी कर्णधार विराट कोहली (2), दोघेही स्वस्तात तंबूत परतले. पण त्यानंतर क्रिजवर आलेल्या सूर्यकुमार यादवने केएल राहुलसोबत डाव सावरला. दोघांनी दमदार फलंदाजी करत धावसंख्या 100 पार नेली. पण अर्धशतक करुन राहुल 55 धावांवर बाद झाला. त्यानंतर हार्दीक पंड्या क्रिजवर आल्यावर त्यानेही चांगली फलंदाजी केली. पण तोवर सूर्या 46 धावा करुन बाद झाला. मग हार्दीकने एकहाती तुफान फलंदाजी करत 30 चेंडूत नाबाद 71 धावा ठोकल्या आणि धावसंख्या 208 पर्यंत नेत ऑस्ट्रेलियासमोर 209 धावांचे आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाचा संघ 209 धावांचं मोठं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आला असता त्यांची सुरुवातही चांगली झाली. पण 39 धावांवर आरॉन फिंच (22) बाद झाला. पण त्यानंतर कॅमरुननं स्मिथसोबत धडाकेबाज फलंदाजी सुरु ठेवली. आपलं पहिलं वहिलं आतंरराष्ट्रीय टी20 अर्धशतक झळकावत ग्रीनने महत्त्वाची भूमिका पार पाडली. 61 धावा करुन तो बाद झाला, स्मिथही 35 धावा करुन बाद झाला. पण मॅथ्यू वेडने 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. दोन धावा शिल्लक असताना वेड बाद झाला, पण कमिन्सने स्ट्राईकवर येत चौकार खेचत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.


हे देखील वाचा-