भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत क्रिकेटला खूप पसंती आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही देश एकमेकांना सामोरे जातात तेव्हा क्रिकेटप्रेमींचा उत्साह डबल होतो. मात्र, सध्या पाकिस्तानशी राजकीय तणावामुळे दोन्ही देश बराच काळपासून एकमेकांशी कोणतीही मालिका खेळलेले नाही. असे असले तरी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या खेळाडूंना मोठं फॅन फोलोविंग आहे.


अलीकडेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीची पत्नी समिया आरझूने तिचा आवडता फलंदाज भारतीय कर्णधार विराट कोहली असल्याचे सांगितले आहे. कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. त्याच्या फलंदाजीबरोबरच विराटने आपल्या फिटनेसवरही विशेष लक्ष दिले आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.






सामिया आरझूने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर चाहत्यांसमवेत प्रश्नोत्तराच्या सत्रात विराट तिचा आवडता फलंदाज असल्याचे सांगितले आहे. संभाषणादरम्यान एका चाहत्याने सामियाला विचारले की तुमचा आवडता गोलंदाज हसन अली असेल. पण तुमचा आवडता फलंदाज कोण आहे? त्याला उत्तर देताना त्यांनी रन मशीन विराट कोहलीचे नाव लिहिले. हसनच्या पत्नीच्या उत्तरानं सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरुय.




2019 मध्ये सामिया आणि हसनचा विवाह
सामियाचा जन्म हरियाणामध्ये झाला होता. ती एमिरेट्स एअरलाइन्समधील उड्डाण इंजिनियर आहे. तिचे कुटुंब सध्या नवी दिल्लीत वास्तव्यास आहे. सामिया हसनला पहिल्यांदा दुबईमध्ये भेटली. भेट आधी मैत्री आणि नंतर प्रेमात बदलली. अखेर दोघांनी 20 ऑगस्ट 2019 रोजी एका खास कार्यक्रमात लग्न केले. हसन हा पाकिस्तान संघाचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे.