Wasim Akram on Team India : नुकतीच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत असे काही घडले जे इतिहासात नोंदले गेले. न्यूझीलंडने भारतीय भूमीवर प्रथमच कसोटी मालिका जिंकलीच शिवाय टीम इंडियाचा 3-0 असा क्लीन स्वीप करून नवा विक्रमही रचला. दुसरीकडे भारतीय संघाला 24 वर्षांनंतर घरच्या मैदानावर अशा वाईट पराभवाला सामोरे जावे लागले. खरंतर 2000 साली दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत भारतीय संघाचा क्लीन स्वीप केला होता. या मालिकेच्या 24 वर्षांनंतर आता टीम इंडियाने कसोटी मालिका जिंकली आहे.


सध्या क्रिकेट विश्वात भारतीय संघाच्या पराभवाची सर्वाधिक चर्चा होत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराकडून एक मोठे विधान समोर आले आहे, जे भारतीय चाहत्यांना अजिबात आवडलेले नाही. खरंतर, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याला वाटते की, पाकिस्तानला कसोटी संघ विशेषत: फिरकीच्या ट्रॅकवर भारताला पराभूत करू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत भारताचा 0-3 असा ऐतिहासिक पराभव आणि इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत पाकिस्तानच्या 2-1 अशा विजयानंतर अक्रमचे वक्तव्य आले आहे.


सोमवारी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात कॉमेंट्री करताना अक्रम इंग्लंडचा माजी फलंदाज मायकल वॉनशी बोलत होता. वॉनने अक्रमला सांगितले की, मला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका बघायची आहे. यावर अक्रमने उत्तर दिले, ही खूप मोठी मालिका असेल.  




मायकल वॉन पुढे म्हणाले की, पाकिस्तान आता टर्निंग पिचवर भारताला हरवू शकतो. यानंतर अक्रम म्हणाला की, पाकिस्तानला आता फिरकीच्या ट्रॅकवर कसोटीत भारताला पराभूत करण्याची संधी आहे. नुकताच पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धची मालिका 2-1 ने जिंकली. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकही कसोटी मालिका खेळली गेली नाही. या दोघांमधील शेवटचा कसोटी सामना 2007-08 मध्ये खेळला गेला होता ज्यात भारतीय संघ 3-1 ने जिंकला होता.


हे ही वाचा -


KL Rahul Team India : केएल राहुलचे डिमोशन! BCCI ने रातोरात घेतला मोठा निर्णय, आता 'या' संघात खेळणार


Ind vs Sa T20 : स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार नव्हे तर 'इथं' फुकटात पाहा भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 सामने, जाणून घ्या A टू Z