India vs Australia Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली. या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. या कसोटी मालिकेत टीम इंडियाला न्यूझीलंडने क्लीन स्वीप दिला आणि भारतीय संघाने ही मालिका 3-0 ने गमावली. या मालिकेतील दारूण पराभवानंतर बीसीसीआयने अचानक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने अचानक टीम इंडियाच्या दोन स्टार खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे खेळाडू दुसरे कोणी नसून केएल राहुल आणि ध्रुव जुरेल आहेत.


KL राहुल खेळणार ज्युनियर संघात


केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत तो फ्लॉप ठरला होता, त्यानंतर त्याला शेवटच्या 2 कसोटीतून वगळण्यात आले. आता बीसीसीआयने राहुलबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केएल राहुलसह, बोर्डाने यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला भारत अ संघात सामील केले आहे. हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होतील आणि ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळतील. या भारत अ संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे.


सर्फराज खानच्या अपयशामुळे पुन्हा एकदा भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये राहुलचा समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देते. अशा परिस्थितीत बीसीसीआयसह टीम इंडिया व्यवस्थापनाने राहुलला भारतीय संघात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून तो तिथे खेळून फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करू शकेल आणि तिथल्या खेळपट्टीनुसार स्वत: ला जुळवून घेऊ शकेल. याचा फायदा राहुल आणि टीम इंडियाला बॉर्डर-गावसकर मालिकेत होऊ शकतो.


पीटीआयच्या म्हणण्यानुसार, न्यूझीलंडविरुद्ध 3-0 च्या पराभवानंतर बीसीसीआय लवकरच संघातील वरिष्ठ खेळाडूंविरोधात कठोर निर्णय घेऊ शकते. वृत्तानुसार, बीसीसीआय व्यवस्थापन, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघाचे चार वरिष्ठ खेळाडू रोहित, विराट, अश्विन आणि जडेजा यांच्यात लवकरच बैठक होणार आहे. यामध्ये या खेळाडूंच्या भवितव्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली राहिली नाही, तर यापैकी रोहित आणि अश्विन या दोन खेळाडूंना कसोटी संघातून वगळले जाऊ शकते.


बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.


हे ही वाचा -


BCCI on Gautam Gambhir : मायदेशात माती खाल्ल्यानंतर BCCI नाराज, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर गौतम गंभीरची होणार हकालपट्टी?