Rohit Sharma Virat Kohli last 10 Test Innings Stats : न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मालिकेत टीम इंडियाला 0-3 असा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाच्या पराभवामागे त्यांची कमकुवत फलंदाजी हेच कारण होते. टीम इंडियाच्या फलंदाजांनी न्यूझीलंडविरुद्ध अत्यंत खराब कामगिरी केली. धावा करण्याची जबाबदारी विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या स्टार फलंदाजांवर होतो. पण या दोघांची आकडेवारी इतर फलंदाजांच्या तुलनेत खूपच खराब होती.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत वेगवान गोलंदाजीबद्दल खूप चिंतेत दिसत होता. तर फिरकीपटूंनी विराट कोहलीला त्रास दिला आहे. या दोन खेळाडूंच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. रोहित शर्माने गेल्या 10 डावात केवळ 133 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीने शेवटच्या 10 कसोटी डावांमध्ये 192 धावा केल्या आहेत. या दोन्ही फलंदाजांनी घरच्या मैदानावर सर्व 10 डाव खेळले आहेत. देशांतर्गत परिस्थितीत या दोन स्टार्सची अवस्था अशी असताना ऑस्ट्रेलियात काय होणार, हा विचार करण्यासारखा विषय आहे.
शेवटच्या 10 डावात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज
- 470 धावा - शुभमन गिल
- 431 धावा - अक्षर पटेल
- 422 धावा - ऋषभ पंत
- 379 धावा - यशस्वी जैस्वाल
- 354 धावा - वॉशिंग्टन सुंदर
- 339 धावा - केएल राहुल
- 309 धावा - सर्फराज खान
- 282 धावा - अजिंक्य रहाणे
या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नावाचा समावेश नाही. केएल राहुल त्याच्या फॉर्ममुळे ट्रोल झाला. पण त्याने शेवटच्या 10 कसोटी डावांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या यादीत वॉशिंग्टन सुंदरही या दोघांच्या पुढे आहे. अशी आकडेवारी पाहता या दोन महान खेळाडूंचे युग हळूहळू संपत असल्याचे स्पष्ट झाले आहे. टीम इंडिया लवकरच बदलाच्या काळातून जाणार आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीला लवकरात लवकर फॉर्म परत मिळवावा लागेल. अन्यथा टीम इंडियाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघही जाहीर करण्यात आला आहे. टीम इंडियाला ही मालिका जिंकायची असेल, तर विराट कोहली आणि रोहित शर्माला आपले आकडे सुधारावे लागतील.
हे ही वाचा -
KL Rahul Team India : केएल राहुलचे डिमोशन! BCCI ने रातोरात घेतला मोठा निर्णय, आता 'या' संघात खेळणार