PAK vs ENG: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झालीय. ज्यात पाकिस्तानचा गोलंदाज जाहिद महमूदच्या (Zahid Mahmood) नावावर नोंद झालेल्या लाजिरवाण्या विक्रमाचाही समावेश आहे.  या सामन्यात पाकिस्तानकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या जाहिद महमूदनं सर्वाधिक धावा खर्च केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो टॉपवर पोहचलाय.


इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जाहिद महसूदनं एकूण 235 धावा करत चार विकेट्स घेतल्या. त्यानं या सामन्यात 7.12 च्या इकॉनॉमीसह धावा खर्च केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सूरज रणदीवच्या नावावर होता. त्यानं कसोटी सामन्यात पदार्पण करताना 222 धावा दिल्या होत्या. दरम्यान, कसोटी पदार्पणात 200 हून अधिक धावा खर्च करणाऱ्या इतर गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात.


सुरज रणदिव
कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दुसऱ्या क्रमांकावर आहे.  त्यानं 2010 मध्ये भारताविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं. या सामन्यात गोलंदाजी करताना त्यानं 222 धावा दिल्या होत्या. हा सामना श्रीलंकेच्या कोलंबो येथे खेळला गेला होता.


जेसन क्रेझा
या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज जेसन क्रेझाचंही नाव आहे. त्यानं कसोटी पदार्पणाच्या सामन्यात 8 विकेट घेतल्या होत्या. मात्र, 215 धावाही खर्च केल्या होत्या. त्यानं आपल्या कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना नागपूर येथे भारताविरुद्ध खेळला होता.


ओमारी बँक्स
वेस्ट इंडिजचा माजी ऑलराऊंडर ओमारी बँक्सनं 2003 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिजटाऊन येथे कसोटी पदार्पण केलं होतं. ओमारी बँक्सनं कसोटीत पदार्पणाच्या सामन्यात गोलंदाजी करताना 3 विकेट्स घेतल्या होत्या आणि 204 धावा दिल्या.


ट्वीट-






इंग्लंडची जबरदस्त फलंदाजी
इंग्लंडचा संघ तब्बल 17 वर्षानंतर कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये पोहचलाय. रावलपिंडी क्रिकेट स्टेडियमर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंडचा पहिला डाव 657 संपुष्टात आला. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीनं (122 धावा) ऑली पोप (108 धावा), बेन डकेटनं (107 धावा) आणि हॅरी ब्रूकनं 153 धावांची खेळी केली. यासह इंग्लंडचा संघ कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करणारा संघ ठरला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 112 वर्षाचा विक्रम मोडीत काढला आहे. 


हे देखील वाचा-


FIFA WC 2022: सर्बियाला हरवून स्वित्झर्लंडची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक!