FIFA WC 2022: फिफा वर्ल्डकपच्या सामन्यात शुक्रवारी रात्री स्वित्झर्लंडनं सर्बियाचा 3-2 नं (Switzerland vs Serbia) पराभव केला. या विजयासह स्वित्झर्लंडच्या संघानं राऊंड ऑफ 16 मध्ये धडक दिली. ग्रुप 'जी' मध्ये असलेल्या स्वित्झर्लंडच्या संघानं कॅमेरून आणि सर्बियाचा पराभव केला.  या गटातून ब्राझील अव्वल स्थानावर राहून बाद फेरीसाठी पात्र ठरलाय.


फुटबॉल विश्वचषकात स्वित्झर्लंडनं आपल्या पहिल्या सामन्यात कॅमेरूनविरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, राऊंड ऑफ 16 मध्ये पोहण्यासाठी स्वित्झर्लंडच्या संघाला कोणत्याही परिस्थितीत सर्बियाविरुद्ध सामना जिंकायचा होता. सर्बियाविरुद्धच्या सामन्यात पराभव किंवा सामना अनिर्णित ठरला असता तर, स्वित्झर्लंडच्या संघाला ब्राझील आणि कॅमेरुन यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहवं लागलं असतं. पण, स्वित्झर्लंडनं स्वबळावर पुढच्या फेरीत प्रवेश केला.


ट्वीट-






 


ट्वीट-






 


स्वित्झर्लंड-सर्बिया यांच्यात चुरशीची लढत
स्वित्झर्लंड-सर्बिया यांच्यातील सामन्यात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध दमदार खेळ दाखवला. या सामन्यात स्वित्झर्लंडच्या झारदान शकीरीनं 20व्या मिनिटाला पहिला गोल संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यानंतर आणि मिट्रोविक (26व्या मिनिट) आणि व्लाहोविच (35व्या मिनिटाला) बॅक टू बॅक गोल करत सर्बियाचाच्या संघानं कमबॅक केलं. यावेळी सर्बियाचा संघ राऊंड ऑफ 16 साठी पात्र ठरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण पहिल्या हाफच्या आधी स्वित्झर्लंडच्या ब्रिएल एम्बोलोनं गोल करत सामना पुन्हा एकदा बरोबरीत आणला. 


रिमो फ्रियुलरच्या निर्णायक गोल
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला रिमो फ्रियुलरच्या (48व्या मिनिटाला) गोलनं स्विस संघाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. रिमोचा हा गोल निर्णायक ठरला आणि स्वित्झर्लंडनं सामना जिंकत राऊंड ऑफ 16 मध्ये एन्ट्री केली..


हे देखील वाचा-