Anil Chaudhary on Rohit Sharma : भारतीय संघाचा सध्याचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माची गणना जगातील सर्वात खतरनाक फलंदाजांमध्ये केली जाते, तो कोणत्याही गोलंदाजाला आपल्यासमोर टिकू देत नाही. त्याच्या फलंदाजीने सगळेच प्रभावित झाले आहेत. दरम्यान, पंच अनिल चौधरी यांनी 'हिटमॅन'बाबत आणखी एक मोठा खुलासा केला असून त्याच्याविरुद्ध अंपायरिंग करणे सर्वात सोपे असल्याचे सांगितले.
रोहित शर्मा हा अतिशय हुशार खेळाडू
खरंतर, अनिल चौधरी नुकतेच शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टवर आले होते. पॉडकास्ट दरम्यान त्याने रोहित शर्माचे खूप कौतुक केले. यादरम्यान होस्टने विचारले की, रोहित शर्माला सर्वजण विसरभोळा खेळाडू म्हणतात, त्याच्याबद्दल थोडे सांगा. यावर अंपायर म्हणाले की, 'तो खूप हुशार खेळाडू आहे. त्याची क्रिकेटची समज खूप चांगली आहे. त्याची फलंदाजी पाहिल्यानंतर तुम्हाला तसे वाटत नाही. जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा असे वाटत की 120 वर गोलंदाजी होत आहे आणि जेव्हा दुसरा खेळाडू येतो तेव्हा असे दिसते की तो 160 वर गोलंदाजी करत आहे.
रोहितसारख्या खेळाडूविरुद्ध अंपायरिंग करणे सर्वात सोपे...
यादरम्यान अनिल चौधरी म्हणाले की, रोहित शर्मासारख्या खेळाडूविरुद्ध अंपायरिंग करणे सर्वात सोपे असते. एकतर तो आऊट असो किंवा नॉट आउट. तो प्लेट प्लेट खेळत नाही. त्याचा फूटवर्क खूप चांगला आहे आणि तो चेंडूला पुढे जाऊन मारण्यापेक्षा त्याची वाट पाहतो. त्याला चेंडूची उत्तम जाण आहे. ज्या दिवशी रोहित त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो वन मॅन आर्मी असतो.
रोहितचा बॅटिंग क्लास
पॉडकास्ट दरम्यान, होस्टने अनिल चौधरीला विचारले की तुम्हाला रोहित शर्मा कोणत्या भूमिकेत जास्त आवडतो, फलंदाज की कर्णधार. त्यावर अंपायर म्हणाले की, त्याला फलंदाजीत क्लास आहे. त्याचे कर्णधारपदही चांगले आहे, यात शंका नाही. जेव्हा माणूस बाहेर बसलेला असतो तेव्हा त्याला त्याची फलंदाजी बघायला आवडते, कारण तो अशा प्रकारे शॉट्स खेळतो. यासोबतच त्याने हिटमॅनचा पुल शॉट हा त्याचा आवडता शॉट असल्याचेही सांगितले.
हे ही वाचा -
हार्दिक पांड्याचा मुलगा येणार नाही भारतात? नताशासोबत राहून विसरतोय आपल्या मातीला? VIDEO व्हायरल