Hardik Pandya Son Agastya : टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर हार्दिक पांड्या भारतात परतला, तेव्हा त्याने आपला मुलगा अगस्त्यसोबत विजय साजरा केला. स्टार ऑलराऊंडरने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. आपल्या मुलासोबतचा एक फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, 'मी जे काही करतो, ते तुझ्यासाठी करतो.' पण काही दिवसांनी हार्दिक आणि नताशाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आणि नताशा मुलगा अगस्त्यासोबत सर्बियाला गेली.


नताशा स्टॅनकोविक सध्या तिचा मुलगा अगस्त्यासोबत सर्बियामध्ये आहे. ती इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, ज्यामध्ये ती बहुतेक वेळा तिच्या मुलासोबत दिसते. ही पोस्ट पाहता, नताशा आपल्या मुलाला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि एक आई म्हणून तिचे कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहे, असे दिसते. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला पाहून चाहते म्हणत आहेत की, अगस्त्य आता त्याचे भारतीय रंग विसरत आहे.


हार्दिकच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल 


अलीकडेच नताशाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. ज्यामध्ये अगस्त्य सर्बियन भाषेत बोलताना दिसत होता. आपल्या मुलाचा व्हिडिओ शेअर करताना नताशाने आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, तिच्या मुलाच्या तोंडून पहिल्यांदा सर्बियन भाषा ऐकून छान वाटत आहे. हार्दिक आणि नताशाचा घटस्फोट 18 जुलै 2024 रोजी झाला होता. तेव्हापासून त्यांचा मुलगा आईसोबत आहे.






हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशाने इंस्टाग्रामवर एक रहस्यमय पोस्ट केली होती जी व्हायरल होत आहे. त्यांनी पालकत्वाबद्दल एक लांबलचक चिठ्ठी लिहिली होती आणि सांगितले होते की, जेव्हा तुम्ही मुलाला जन्म देता तेव्हा त्यांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची असते. तुम्ही मुलाचा आधार आहात आणि तुम्हाला एकटे सोडले जाऊ नये. या पोस्टनंतर चाहत्यांनीही हार्दिकला ट्रोल केले होते. आता नताशा ज्या पद्धतीने आपल्या मुलाची सतत काळजी घेत आहे, ते पाहता अगस्त्यही सर्बियाच्या रंगात रंगत चालला आहे आणि अशा परिस्थितीत तो भारतात परतेल, अशी आशा कमी आहे. असे चाहते म्हणत आहे.


हे ही वाचा -


Dwayne Bravo Retirement : CSKला 4 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती! कधी खेळणार शेवटचा सामना?


Shreyas Iyer : 'त्या' शॉटमुळं श्रेयस अय्यर पुन्हा आला गोत्यात, कारकिर्द येणार धोक्यात?