ICC Cricket World Cup League: आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग टू 2023-2027 स्पर्धा सुरु आहे. नामिबिया आणि ओमान यांच्यातील मॅच आज झाली. ओमाननं 4 विकेटनं नामिबियाला पराभूत केलं. यामॅचमध्ये ओमानच्या (Oman) बिलाल खान यानं दमदार बॉलिंग केली. बिलाल खाननं (Bilal Khan)दमदार कामगिरी करत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि शाहीन आफ्रिदी यांच्यासारख्या भेदक गोलंदाजांना पिछाडीवर टाकलं आहे. बिलालनं कमी सामन्यांमध्ये 100 विकेट घेतल्या.  ओमाननं ही मॅच 4 विकेटनं शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकली. 


वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात 100 विकेट घेण्याचा विक्रम नेपाळच्या संदीप लामिछाने यांच्या नावावर आहे. त्यानं 42 मॅचमध्ये 100 विकेट घेतल्या आहेत. तर, अफगाणिस्तानच्या राशिद खाननं 44 मॅचमध्ये 100 विकेटचा टप्पा पूर्ण केला. बिलाल खाननं 49 मॅचमध्ये100 विकेट घेतल्या आहेत. शाहीन आफ्रिदीनं 51 मॅचमध्ये 100 विकेट घेतल्या.  


बिलाल खान वेगवान गोलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.100 विकेट कमी सामन्यांमध्ये घेण्याची कामगिरी करण्याबाबत जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी या दोघांना बिलाल खाननं मागं टाकलं. बिलाल खाननं नामिबियाविरुद्ध 10 ओव्हरमध्ये  50 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्यानं यात एक मेडन ओव्हर देखील टाकली. 


ओमानसाठी बिलाल खाननं दमदार कामगिरी केली आहे. त्यानं आतापर्यंत 19 मॅचमध्ये 101 विकेट घेतल्या आहेत. बिलाल खाननं 78  टी 20 मॅच खेळल्या असून 110 विकेट घेतल्या आहेत. बिलालची वनडेमध्ये 31 धावा देत  5 विकेट ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तर टी 20 मध्ये त्यांन 19 धावा देत 4 विकेट घेतल्या ही सर्वोत्तम कामगिरी आहे.  


ओमान आणि नामिबिया यांच्यातील मॅच रोमांचक झाली. नामिबियानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 50 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 196  धावा केल्या. ओमाननं हे आव्हान 49.1 ओव्हरमध्ये 5 बॉल शिल्लक ठेवत चार विकेटनं मॅच जिंकली.  


आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 मध्ये एकूण 8  संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये कॅनडा, नामिबिया, स्कॉटलँड, हॉलंड, ओमान, नेपाळ, यूएई आणि अमेरिका हे संघाचा समावेश होता. मात्र अमेरिकेनं अद्याप एकही सामना खेळला नाही म्हणजे त्यांनी स्पर्धेत सहभाग घेतलेला नाही. या स्पर्धेत कॅनडा आणि नामिबिया गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तर, स्कॉटलँड तिसऱ्या स्थानावर आहे.


संबंधित बातम्या :


मराठमोळ्या खेळाडूचा इंग्लंडमध्ये डंका, रहाणेची दमदार कामगिरी, पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं

USA : पाकिस्तानला पराभूत करुन खळबळ उडवणाऱ्या अमेरिकेचा पाय खोलात, आयसीसीकडून मोठ्या हालचाली, बंदी येणार?