Ajinkya Rahane Half Century लंडन: अजिंक्य रहाणे बऱ्याच काळापासून टीम इंडियात संधी कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहे. अजिंक्य रहाणेला टीम इंडियाच्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात संधी मिळालेली नाही. अजिंक्य रहाणेनं भारताकडून शेवटची कसोटी मॅच 7 जुलै रोजी खेळली होती. तर, अखेरची एकदिवसीय मॅच 2018 मध्ये खेळली होती. अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत असला तरी त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. अजिंक्य रहाणे सध्या इंग्लंडमध्ये देशांतर्गत टुर्नामेंटमध्ये वनडे कप खेळत आहे. रहाणे या स्पर्धेत लेस्टरशायर संघाकडून खेळतोय. अजिंक्यनं दमदार अर्धशतक केलं. त्यानं 71 धावांची खेळी केली. लेस्टरशायरनं या जोरावर 370 धावांचं आव्हान विरोधी संघासमोर ठेवलं होतं.
वन-डे कप 2024 च्या ग्रुप बी मध्ये लेस्टरशायर आणि नॉटिंघमशायर यांच्यात मॅच सुरु आहे. या सामन्यात लेस्टरशायरनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 6 विकेटवर 369 धावा केल्या. अजिंक्य रहाणे चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला. लेस्टरशायरकडून अजिंक्य रहाणे पहिलीच मॅच खेळत होता. त्यानं 60 बॉलमध्ये 71 धावा केल्या. रहाणेनं आजच्या मॅचमध्ये 9 चौकार मारले. तर, लेविस हिलनं 81 धावा केल्या. रहाणे या खेळीनंतर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आला.
अजिंक्य रहाणे बऱ्याच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. अजिंक्यनं भारतासाठी शेवटचा वनडे सामना 2018 मध्ये खेळला होता. तर, शेवटचा टी 20 सामना 2016 मध्ये खेळला आहे. रहाणेनं भारतासाठी 20 टी 20 मॅचमध्ये 375 धावा केल्या आहेत. 90 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 2962 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेनं 85 कसोटी सामने खेळले आहेत. भारतासाठी शेवटची कसोटी मॅच त्यानं जुलै 2024 मध्ये खेळली होती.
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी
अजिंक्य रहाणेनं आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. गेल्या हंगामात त्यानं चेन्नई सुपर किंग्जकडून सहभाग घेतला होता.रहाणेनं आयपीएलमध्ये 4642 धावा केल्या असून 2 शतकं आणि 30 अर्धशतकं केली आहेत.
संबंधित बातम्या :