Ravindra Jadeja bowled Steve Smith:  चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर भारताच्या फिरकी गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव आणि आर. अश्विन यांनी अचूक टप्प्यावर मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखले. स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांनी संघर्ष केला, पण त्यांनाही तग धरता आली नाही. डेविड वॉर्नरचा अडथळा कुलदीपने दूर केला तर स्मिथला रविंद्र जाडेजाने तंबूत पाठवले. स्मिथला टाकलेला चेंडू रविंद्र जाडेजाचा जबरदस्त चेंडू होता. जाडेजाचा चेंडू स्मिथलाही समजला नाही. 


जाडेजाने टाकलेल्या चेंडूपुढे स्मिथही हतबल झाला. त्याला चेंडू समजलाच नाही. काही समजायच्या आत स्मिथच्या दांड्या उडाल्या होत्या. काही क्षण स्मिथ खेळपट्टीवर थांबला. आपण बाद झाल्याचे स्मिथला विश्वास बसत नव्हता. अखेर त्याने खेळपट्टी सोडली. स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाजी ढेपाळली, एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतले. कॅमरुन ग्रीन, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल एकापाठोपाठ एक तंबूत परतले. रविंद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. यामध्ये स्मिथ, लाबुशेन आणि अॅलेक्स कॅरी यांचा समावेश आहे. 


पाहा रविंद्र जाडेजाचा ड्रीम चेंडू, स्मिथही झाला हतबल - 






ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. डेविड वॉर्नर आणि स्मिथ यांनी संघर्ष केला. पण इतर फलंदाजांनी लोटांगण घेतले. एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही, 30 धावांचा पल्लाही ओलांडता आला नाही. 


जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला शून्यावर बाद करत भारताला दमदार सुरुवात करुन दिली. पहिली विकेट झटपट गेल्यानंतर डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ या अनुभवी फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनीही एकेरी दुहेरी धावसंख्या घेत फलंदाजी सुरु ठेवली. ही जोडी धोकादायक ठरते की काय असे वाटत असतानाच कुलदीप यादवने डेविड वॉर्नरचा अडथळा दूर केला. वॉर्नर आणि स्मिथ यांच्यामध्ये 69 धावांची भागिदारी केली. डेविड वॉर्नर याने 52 चेंडूत 41 धावांची खेळी केली. या खेळीत वॉर्नरने 6 चौकार ठोकले. वॉर्नरपाठोपाठ स्मिथही तंबूत परतला. जाडेजाच्या जबरदस्त चेंडूवर स्मिथ त्रिफाळाचीत झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. स्मिथने 71 चेंडूत 46 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये स्मिथे 5 चौकार लगावले.