rashid khan : अफगानिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान याने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. राशिद खानने वर्ल्डकपमध्ये मिळालेली संपूर्ण मॅच फी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानमध्ये शनिवारी भूकंप झाला होता. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी राशिद खान याने विश्वचषकातील सामन्याची मॅच फी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. राशिद खान याच्या या निर्णायाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. राशिद खान हा जगातील लोकप्रिय आणि महान गोलंदाजापैकी एक आहे. तो जितका चांगला गोलंदाज आहे, तितकाच तो एक चांगला माणूसही आहे. याचा पुरावा ते अनेकदा त्यांच्या चांगल्या स्वभावाने दिला, आजही त्याने आसाच मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानमधील भूकंपग्रस्तांसाठी पुढाकार घेतला आहे.


राशिद खान याने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील प्रांतांमध्ये (हेरात, फराह आणि बादघिस) भूकंप झाल्याचे ऐकूण मला खूप वाईट वाटले.  भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या सर्व सामन्याची फी दान करत आहे. लवकरच आम्ही एक फंड रेसिंग अभियान सुरु करणार आहोत, ज्याद्वारे त्या सर्व लोकांना मदत मिळेल, असे ट्वीट राशिद खान याने केले आहे. 


राशिद खान याच्या या निर्णायाचे सर्वाच स्तरातून कौतुक केले जात आहे. जगभरातून अफगाणिस्तानला मदतीचा हात मिळत आहे.


 






दोन हजार जणांचा मृत्यू


अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये  6.3 रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake) झाला आहे. या विनाशकारी भूकंपामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपामुळे आतापर्यंत 2000 जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो नागरिक जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, शोध आणि बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


पश्चिम अफगाणिस्तानमध्ये शनिवारी भीषण भूकंप झाला आहे. 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपानंतर जोरदार झटके बसल्याने मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने याबाबत माहिती दिली आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या 2,000 च्या पुढे गेली आहे. शनिवारी अफगाणिस्तानमध्ये जोरदार भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल होती. या शक्तिशाली भूकंपानंतरही पश्चिम अफिगाणिस्तानमध्ये भूकंपानंतर जोरदार हादरे म्हणजे आफ्टर शॉक बसले. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर समोर येत आहेत.